shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघाचा कार्यक्रम संपन्न.

एरंडोलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघाचा कार्यक्रम संपन्न.

महिलांचे आरोग्याविषयी उपस्थित मान्यवरांनी दिला महत्वाचा सल्ला...

एरंडोल - येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघाचा कार्यक्रम नुकताच शिवाजीनगर जवळील अंजनी नदीकाठी माऊली लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांचे आरोग्य आणि महिलांनी येणार्‍या अडचणी आणि उपाय यावर उपस्थित महिला मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाच्या सुरूवातीस खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना सादर करण्यात येवून दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे तथा माऊली लॉन्सचे संचालक अतुल जगताप यांचा सपत्नीक सत्कार माजी उपनगराध्यक्षा तथा महिला संघाच्या उपाध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी केला. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. उज्वला राठी आणि डॉ. राखी काबरा यांनी महिलांचे आरोग्य मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या चांगले राहण्यासाठी उपस्थित महिलांना बहुमोल मार्गदर्शन करून आहाराविषयी आणि मानसिक तणावापासून दुर राहण्यासाठी महत्वाचे सल्ले देत महिलांची मने जिंकली. यावेळी डॉ. उज्वला राठी आणि डॉ. राखी काबरा यांचा देखील सत्कार शकुंतला पाटील आणि इंदिरा पाटील यांनी केला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र (तळोदा) येथे आयोजित कार्यक़्रमात जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. उज्वला देशपांडे यांचा सत्कार महिला संघाच्या पदाधिकारींनी केला. प्रा. उज्वला देशपांडे यांनी देखील महिलांना येणार्‍या अडचणी व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. माऊली लॉन्सचे अतुल जगताप यांनी सभागृह उपलब्ध करून देवून महिला संघाला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या पेंढारकर, लाळगे, सुमन महाजन यांचा सत्कार करण्यात आला. माजी मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने मॅडम, निवृत्त शिक्षिका शालिनी कोठावदे, अरूणा पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला संघाच्या अध्यक्षा शोभा साळी, सूत्रसंचलन शशिकला पांडे यांनी तर आभार निवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनुराधा पाटील, उषा पाटील, पुष्पा बिर्ला, मंदा देशमुख, इंदिरा पाटील, आशा महाजन, शकुंतला पाटील, कल्पना लोहार, नानी, पुष्पा पाटील, सुनिता पाटील, महाजन ताई, कुळकर्णी मॅडम, संध्या चौधरी, पिंगळे यांचेसह सभासद भगिनींनी परिश्रम घेतले.

close