एरंडोल – एरंडोल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज (दि. १६ नोव्हेंबर) मोठी गती मिळाली. शेवटचा एक दिवस बाकी असतानाच आज नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी तब्बल २० अर्ज दाखल झाले. याआधीच्या सहा दिवसांत २ नगराध्यक्ष पदासह केवळ १० नगरसेवकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे एकूण नगरसेवक पदासाठी अर्जांची संख्या २३ वर पोहोचली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी रघुनाथ राजाराम महाजन, गीतांजली नरेंद्र ठाकूर आणि नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी अर्ज दाखल केले. तर नगरसेवक पदासाठी अनिल केशव महाजन, क्षमा नयन आरखे, पठाण नय्यमखा दलशेरखा, सुनिता रुपेश माळी, कृष्णा प्रल्हाद ओतारी, श्रद्धा विशाल वंजारी, पौर्णिमा महेश देवरे, सैय्यद शबाना बी नुरुद्दीन, कागजी नजमा बी सईद, कागदी नसीमाबी शहाबुद्दीन, सैय्यद इमरान अली जाफरअली, सत्यभामा बाई माधव पाटील, अजय साहेबराव महाजन, गीतांजली नरेंद्र ठाकूर, प्रतिभा दिनकर पाटील, सीताबाई वासुदेव गायकवाड, ईश्वर युवराज बिऱ्हाडे आणि प्रमोद राजेंद्र महाजन यांनी उमेदवारी अर्ज केले.
दरम्यान, आज सकाळी शहरातील मरीमाता मंदिरातून महायुतीच्या उमेदवारांचा भव्य जनसमर्थनासह रॅलीच्या स्वरूपात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी मोठ्या उत्साहात नामनिर्देशन दाखल केले. यावेळी आमदार अमोल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हा युवा सेना प्रमुख प्रा. मनोज पाटील, तालुकाध्यक्ष योगेश महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन,जगदीश पाटील,समाधान पाटील,बबलु चौधरी,माजी तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील, सुनील(भैया भाऊ)पाटील,रविंद्र जाधव तसेच असंख्य महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


