अमरावती:
मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सा., (भा.पो.से.), अमरावती ग्रामीण यांनी गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तलीकरीता होणा-या वाहतुकीला आळा घालुन टोळीला पकडण्यासाठी स्था.गु.शा. पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.
त्याअनुषंगाने दिनांक २०/११/२०२५ रोजी स्था.गु.शा. पथकाचे पो.उप.नि. विशाल रोकडे हे त्याचे पथकासह पो.स्टे. मोशी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडून खबर मिळाली की, मोर्शी ते वरुड रोडवरील ग्राम भाईपुर फाट्याजवळ तिन चारचाकी वाहना मध्ये म्हैस व गोवंश वर्गीय जनावरे यांचे पाय व तोंड बांधून क्रुरतेने वागणुक देवून गाडीमध्ये कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरुन स्था.गु.शा. पथकाने सदर वाहनाची पहाणी केली असता त्यामध्ये ०५ नग म्हैस कि.अं. १,१५,०००/-रु, व ०६ गोवंश जातीचे बैल किं.अं.७९,०००/- रु तिन चारचाकी वाहन कि.अं. १०,००,०००/-रु असा एकुण ११,९४,०००/-रु चा माल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी नामे १) अन्सार अहमद अब्दुल जब्बार रा. पुर्णानगर, ता. भातकुली २) अहतेशाम अहमद सुलतान अहमद रा. वलगाव जि. अमरावती ३) शेख फारुख शेख गणी रा. सेल्फीनगर वरुड यांना व जप्त मुद्देमाल पो.स्टे. मोर्शी यांचे ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे. मोशी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा., अमरावती ग्रामीण, श्री. किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. राहुल आठवले, ठाणेदार, पो.स्टे. मोर्शी यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. राहुल गवई, पो.उप.नि. विशाल रोकडे पोलीस अंमलदार स.फो. निरंजन उकंडे, संतोष तेलंग, दिपक पाल, राजेश कासोटे, मारोती वैद्य, चालक किशोर सुने, पो.हे.कॉ. उमाळे. यांनी केली.
ما

