shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोहार वधू-वर परिचय मेळाव्याची प्राथमिक बैठक संपन्न..

वाळकी प्रतिनिधी :-  लोहार समाजाचा जानेवारी मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय लोहार समाज वधू-वर परिचय मेळावा नियोजनाची बैठक अहिल्यानगर मध्ये नुकतीच घेण्यात आली. हा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा पुढील वर्षामध्ये ११ जानेवारी २०२६ मध्ये अहिल्या नगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे संपन्न करण्यात येणार असून अखिल लोहार विकास संघ,लोहार समाजाच्या समविचारी संस्था यांच्या सहकार्याने हा मेळावा होत आहे.यासाठी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

         या राज्यस्तरीय मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव व समाजातील उपवर वधू  उपस्थित राहतील यासाठी समाजामध्ये माहिती पोहोचवण्याचे ठरले असुन समाजातील उपवर वधूंची माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित करण्याचेही सुचित केले.यावेळी नियोजनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले अशी माहिती नवनाथ हराळे यांनी या मेळाव्याची दिली.
        बैठकीचे अध्यक्ष सोमनाथ हारेर यांनी मेळाव्याच्या नियोजनासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.हर्षल आगळे यांनी हा राज्यस्तरीय मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्वांनीच योगदान देण्याचे आवाहन केले.बैठक प्रसंगी उपस्थितांमध्ये संदीप थोरात,हर्षल आगळे,नवनाथ हराळे, प्रभाकर लाड,बाळासाहेब इघे, अमोल जवणे, विनायक गाडेकर, सुधाकर कौसे,अशोक पवार, अशोक हराळे,जालिंदर पोपळघट, निवृत्ती पोपळघट,प्रदीप पोपळघट,गणेश भालके,शिवाजी दवणे,विजय म्हस्के आदी समाज बांधव उपस्थित होते.

गेल्या काही काळात लोहार समाजात अनेक बैठका झाल्या आहेत,ज्यामध्ये समाजाच्या एकजुटीवर,सामाजिक व आर्थिक विकासावर आणि भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यात आली.आजच्या बैठकीत समाजातील मुला मुलींना लग्न जुळवून देण्यासाठी जानेवारी मध्ये वधू-वर मेळाव्यातून प्रयत्न केला जाणार आहे तरी या मेळाव्याला समाजबांधवांनी सहभागी व्हावे.

हर्षल आगळे - वधू- वर समिती सदस्य.
close