shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजधानी खंडोबा यात्रा उत्सवाची जय्यत तयारी ; भक्तांना लाभ घेण्याचे ट्रस्टच्या वतीने आवाहन

वाळकी प्रतिनिधी:- नगर श्रीगोंदा सरहद्दीवर असलेला राजधानी खंडोबा देवस्थान यात्रा ही जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक परंपरा मानली जाते. दरवर्षी चंपाषष्ठी या दिवशी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही बुधवार २६ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या यात्रा उत्सवाची मंदिर ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसराची स्वच्छता,सजावट, प्रकाशयोजना तसेच यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता झाल्यामुळे भाविकांना प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर झाला आहे.दरम्यान अतिशय छोट्या स्वरुपात असलेले खंडोबाचे मंदिर गेल्या १५ वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे प्रकाशझोतात आले आहे.यात्रा काळात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बापूराव भोसले,संतोष लाटे, राजेंद्र लाटे, सुदामजी भोसले, मच्छिंद्र लाटे, संजय लाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.पहाटे व रात्री अशा दोन वेळेस महाआरती होते. 


गावातून छबिना मिरवणूक,मंदिरात जागरण गोंधळ उत्सव केला जातो.येथे भक्त खंडोबाची पुजा करतात आणि विविध विधी पार पाडतात. या यात्रेत 'सदानंदाचा येळकोट' आणि 'चांगभल' या घोषणा दिल्या जातात.यात्रेमध्ये देवाच्या काठीचा मान हा घोंडगेवाडी,कोळगाव येथील लोकांना असून दिवटीचा मान हंगेवाडीकरांना आहे.आहे.यात्रा उत्सवात देवाच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या विविध भागातूनच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यांतून भाविक येत असतात.
close