शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
सामोडे येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप घरटे व शालिनी घरटे यांची कन्या व विशाल रायते यांची भाची निकिता घरटे याचा वाढदिवस परिवाराने पेरू हे फळ कापून अनोख्या पद्धतीने साजरा केला. केक ऐवजी टरबूज, सफरचंद कापून वाढदिवस साजरा करणे हा एक छान उपक्रम असून सर्वांनी याप्रमाणे आपले वाढदिवस साजरे केल्यास नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला हे हिताचे ठरेल. दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण आपल्या आरोग्य हितासाठी केक ऐवजी फळांचा वापर केला तर निश्चितच आपल्याला व आपल्या आरोग्या ला सुद्धा याचा फायदा होणार आहे. शहरांमध्ये असंख्य लोक केक वरती खर्च करतात केक तोंडाला लावतात फेकून देतात. परंतु आपण कापलेला केक आपल्या वाढदिवसा निमित्त हा जर फळाचा असेल तर तो प्रत्येक आपला मित्र, जो आपला वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आलेला आहे. तो त्याची चव आनंदाने चाखू शकतो. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उत्तम आहार तुमच्या माध्यमातून मिळू शकतो. स्वच्छ ताजी फळं छान सजावट करूनत्याला केक च्या स्वरूपात रूपांतर करून तो केक जर वाढदिवस किंवा इतर सोहळ्यासाठी जिथे आपण मैद्याचा केक वापरतो त्याऐवजी फळे वापरले तर तो नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतो. महाराष्ट्रात चिकू, पेरू, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, कलिंगड या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जर फळांच्या केकची मागणी वाढली तर नक्कीच फळ उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे मिळून त्यांचा फायदा होईल. तसेच मागणी वाढल्यानंतर शेतकरीही फळांचे उत्पादन घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. बाजाराच्या मागणी वरच शेतकऱ्यांचं उत्पादन अवलंबून असते. शेतकरी हिताचा संदेश या वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आला व यापुढे ही वाढ दिवस फळे कापून साजरा करावा असे आव्हान सामोडे येथील कन्या निकिता घरटे यांनी सर्वाना यानिमित्त केले. वाढ दिवसाच्या निमित्ताने कधी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, सरकारी हॉस्पिटल येथे बिस्किटे व फळे वाटप करून वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरे केले जातात आता फळे कापून वाढदिवस साजरा करा अशी संकल्पना विशाल रायते यांनी दिली.
याप्रसंगी साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय जी महाजन, पत्रकार दिलीप घरटे, सचिन सोनवणे, पुष्कराज नहीरे, विशाल रायते, ठगूबाई जिरे,विमलताई इंगळे, निमाताई नाहीरे, शोभाताई महाजन, शालूमाई घरटे, सोनी आक्का सोनवणे,सर्वेश सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते,

