shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोवा येथे सुरू झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेस राष्ट्रीय पंच यशवंत बापट यांची सदिच्छा भेट


प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

अहिल्यानगर: दि. १२/ अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव व राष्ट्रीय पंच यशवंत बापट यांनी गोवा येथे सुरू झालेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित जागतिक बुद्धिबळ स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्पर्धेतील विविध आयोजन व्यवस्था, पंच मंडळींचे कार्य, तसेच देश-विदेशातून आलेल्या खेळाडूंच्या सहभागाबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच स्पर्धेच्या संपूर्ण व्यवस्थापनाची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले.

या प्रसंगी गोवा राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष  महेश कांदोळकर यांची त्यांनी भेट घेऊन उत्कृष्ट व देखण्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. बापट यांनी सांगितले की, गोवा येथे चाललेल्या या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन प्रेरणादायी आहे.
बुद्धिबळ क्षेत्रातील तज्ञांच्या या सदिच्छा भेटीमुळे अहिल्यानगरच्या बुद्धिबळ खेळाडू व आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
close