ठाणे / प्रतिनिधी:
ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा सोहळ्यामध्ये थोर समाजसेवक शेठ नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी आवर्जून सहभाग नोंदविला. या पावन प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सन्मान केला.
या भेटीदरम्यान समाजहित, पत्रकारिता आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन याविषयी सकारात्मक चर्चा झाली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी नवनाथ जाधव (प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ), संजय फुलसुंदर (महाव्यवस्थापक, दैनिक समर्थ गांवकरी), राजेंद्र पुराणीक आणि राजेंद्र पांडे यांची उपस्थिती लाभली.
श्रीमद् भागवत कथेसारख्या आध्यात्मिक उपक्रमांतून समाजात सद्भावना, नैतिक मूल्ये आणि एकोपा वृद्धिंगत होतो,असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततापूर्ण आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
000

