shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रकांत शिंदे यांना आशिया खंडातील सर्वात मोठे भारतीय सेनेचे तोफखाना केंद्र, नाशिक येथे गौरवसन्मान


वाळकी प्रतिनिधी :- अहिल्या नगर येथील युद्धभूमीतील अद्वितीय शौर्य अपार निष्ठा आणि सेवाभावाची प्रेरणादायी गाथा म्हणजे श्री चंद्रकांत शिंदे यांचे जीवन युद्ध क्षेत्रामध्ये केलेले विशेष कार्य आणि स्पेशल Abled असूनही देशसेवेसाठी दिलेले अतुलनीय योगदान हे केवळ गौरवाचे नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
   पंधराव्या री-युनियनच्या पवित्र प्रसंगी डायरेक्टर जनरल ऑफ तोफखाना लेफ्टनंट जनरल अधोश कुमार आणि भारतीय सेनेच्या कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष मिसेस अधोश (AWWA) यांच्यातर्फे रु ७०,००० इतकी धनराशी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान एका व्यक्तीचा नाही तर अदम्य इच्छाशक्तीचा आत्मविश्वासाचा आणि राष्ट्रप्रेमाचा गौरव आहे.

     अडचणींवर मात करत पुढे जाणे म्हणजेच खरे शौर्य शरीरावर मर्यादा असू शकतात, पण स्वप्नांवर नाहीत हे श्री चंद्रकांत शिंदे, जिल्हा वेल्फर ऑर्गनायझर,अहिल्यानगर महाराष्ट्र शासन) यांनी कृतीतून सिद्ध केले.प्रत्येक तरुणाला प्रत्येक सैनिकाला आणि प्रत्येक नागरिकाला एकच संदेश देते“देशसेवेसाठी मन मजबूत असेल, तर कोणतीही अडचण अडसर ठरत नाही.”
close