shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामवाडी येथे साईबाबा मंदिर कलशारोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन..

निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर महाराज ) यांच्या किर्तनाचे भव्य आयोजन

वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे):- गुंडेगाव ता.अहिल्या नगर हे गाव श्रीराम प्रभू व गुंड ऋषींच्या पावन पदस्पर्शाने व वास्तव्याने पुनीत झालेले गाव शिवकालीन तसेच पांडवकालीन वारसा या गावाला लाभला असून गुंडेगावाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे.या गावामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रमाण मुबलक आहेत.गावात हरिनाम सप्ताह, भैरवनाथ ,रामेश्वर,लक्ष्मी माता यात्रा, रामनवमी उत्सव, विविध सण उत्सव आदी धार्मिक कार्यक्रम गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

       नुकतेच गुंडेगाव रामवाडी येथे भव्य दिव्य श्री साईबाबा मंदिर बांधण्यात आले असून या मंदिराचा कलशारोहण सोहळा २२ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य धार्मिक कार्यक्रमसह आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यात सुप्रसिद्ध असलेले ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
       सोहळ्याच्या पहिल्या दिवशी बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शिर्डी येथून श्री साईबाबांच्या मूर्तीचे गावातून मिरवणूक सह रामवाडी येथे आगमन होणार आहे.सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह. भ. प. कविराज झावरे महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार २३ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शिर्डी येथील पुजारी यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना पूजा व होम-हवन संपन्न होणार आहे. दुपारी दोन वाजता ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी देवाची) यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर आरती व महाप्रसाद दिला जाणार आहे.
     शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांचे कीर्तन होणार आहे.या चार दिवसीय कार्यक्रमाची सांगता शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.त्यांच्या समाजप्रबोधन कीर्तन त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होणार आहे.या प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण व कीर्तन सोहळ्यास गुंडेगाव व परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी उपसरपंच सुनील भापकर, साईनाथ भापकर, महेश भापकर सह साईबाबा मंदिर समिती रामवाडी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
close