shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘जनहित प्रथम’चा मंत्र घेऊन काम करा नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली भावना. – आमदार अमोल पाटील.

एरंडोल नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात.
‘जनहित प्रथम’चा मंत्र घेऊन काम करा – आमदार अमोल पाटील

एरंडोल – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आमदार मा. अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

‘जनहित प्रथम’चा मंत्र घेऊन काम करा – आमदार अमोल पाटील

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, जनतेने विकास, पारदर्शकता व प्रामाणिक कारभारावर विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाची परतफेड करताना प्रत्येक निर्णयात ‘जनहित प्रथम’ हा मंत्र केंद्रस्थानी ठेवावा. नगरपरिषद ही केवळ प्रशासकीय संस्था नसून शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तिच्यावर आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, प्रकाश व्यवस्था आदी बाबींमध्ये दर्जेदार व लोकाभिमुख काम अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व विश्वासार्ह कारभार देण्याचा निर्धार यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

close