shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केलवडमध्ये भावपूर्ण वातावरणात कै. वत्सलाबाई वाघे यांचे प्रथम पुण्यस्मरण; सोमवार ५ जानेवारीला होणार भव्य कीर्तन सोहळा

 कै. वत्सलाबाई वाघे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त महंत मधुसूदनगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन

शिर्डी प्रतिनिधी : 
राहता तालुक्यातील केलवड येथील प्रतिष्ठित वाघे पाटील परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक कै. गं.भा. वत्सलाबाई लक्ष्मण पाटील वाघे यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा सोमवार, दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ह.भ.प. महंत मधुसूदनगिरीजी महाराज (भगवान श्री सोमेश्वर संस्थान, पिंपळवाडी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती वाघे पाटील परिवाराने दिली आहे.
कै. वत्सलाबाई वाघे यांचे जीवन हे त्याग आणि प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण होते. "दुसऱ्यांसाठी जगता जगता, तू पंढरीची माऊली होऊन गेलीस, पण आज मात्र खरंच सांगतो तू, लाखात एक आई होऊन गेलीस," या भावनांतून कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ वाघे परिवाराचेच नव्हे तर संपूर्ण केलवड गावाची हानी झाली आहे.
त्यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेला हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा सकाळी १० वाजता श्रीराम लॉन्स, श्री ज्ञानेश्वर विद्यालय शेजारी, केलवड (ता. राहता, जि. अहिल्यानगर) येथे संपन्न होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी पिंपळवाडी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. महंत मधुसूदनगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती असणार असून, त्यांच्या कीर्तनातून उपस्थितांना अध्यात्मिक मेजवानी मिळणार आहे.
तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास आणि कीर्तन कार्यक्रमास मित्र परिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन समस्त वाघे पाटील परिवार आणि केलवड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
close