shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर तालुका अध्यक्षपदी शरद कासार,उपाध्यक्षपदी सबिल सय्यद,सचिवपदी दादासाहेब आगळे,खजिनदारपदी रमेश शिंदे

 वाळकी प्रतिनिधी : द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी शरद कासार,उपाध्यक्षपदी सबिल सय्यद,सचिवपदी दादासाहेब आगळे,खजिनदारपदी रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  द युवा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक सोमवार (दि. २ ) रोजी अहिल्यानगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तालुका अध्यक्षपदासाठी शरद कासार यांच्या नावाची सूचना जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब बॉक्सर यांनी मांडली.उपस्थित सर्वांनी त्यास अनुमोदन दिले.त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांच्याही निवड सर्वानुमते करण्यात आली.नवनिर्वाचित अध्यक्ष कासार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितली की द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, शेतकऱ्याचे प्रश्न, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील.त्याचबरोबर समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल.पत्रकार संघ अधिक सक्षम, संघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येईल.
   याप्रसंगी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे  नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष सबिल सय्यद,सचिव दादासाहेब आगळे,कार्याध्यक्ष जिवाजी लगड, खजिनदार रमेश शिंदे, सहसचिव रफिक शेख, संपर्कप्रमुख रियाज पठाण, प्रसिद्धी प्रमुख देविदास गोरे,सदस्य दादासाहेब जावळे, संजय भापकर, बाबासाहेब तिपोळे,सुरेश अंधारे, संतोष जाधव,सेवा संस्थेची अध्यक्ष राजाराम नरोडे,सामाजिक कार्यकर्ते आशिष कासार आदी उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
close