shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वकर्मा जयंती महोत्सवात एचआयव्ही एड्स जनजागृती

मोर्शी:-
एचआयव्ही एड्स याबाबत व्यापक जनजागृती करुन भेदभाव, कलंक कसा कमी करता येईल तसेच जनसामान्यांमध्ये या आजाराबाबत असणारे गैरसमज कसे दुर करून जीवन कसे सुरक्षित करता येईल हे उद्दिष्ट समोर ठेवून विश्वकर्मा जयंती महोत्सवात जनजागृती करण्यात आली. 

 मा. डॉ. प्रमोद पोतदार वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय मोर्शी याचें मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला श्रीकांत गोहाड समुपदेशक, कु. सुवर्णा श्रीराव प्रयोग शाळा तंत्रज्ञ व श्री. विनय शेलुरे यांनी मार्गदर्शन व जनजागृती केली. कार्यक्रमामध्ये संघटनेचे अध्यक्ष मा. दिपक लाडोकर, पदाधिकारी, सदस्य व मार्गदर्शक यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
close