shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनता विद्यालयात प्रभात फेरीचे आयोजन

 वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे): दहावी व बारावीच्या होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भाने महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईछत्तीसी ता. अहिल्यानगर या विद्यालयाच्या वतीने कॉपी मुक्तीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

            कॉपीमुक्त, भयमुक्त व आनंदमय वातावरणात  दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त्त अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री दत्ता पाटील नारळे यांनी दिली. या अभियानांतर्गत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची शपथ विद्यालयांमध्ये देण्यात आली.तसेच परीक्षेनिमित्त परी संवादाचे आयोजन करून परीक्षार्थीचे प्रबोधन करण्यात आले.त्यानंतर 26 जानेवारी निमित्त राज्यभरातील ग्रामपंचायत मध्ये  ग्रामसभांचे आयोजन करण्यात आलेले होते.रुई छत्तीशी येथे झालेल्या ग्राम सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची माहिती दिल्यानंतर कॉपीमुक्तीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचा ठराव करण्यात आला.
शाळास्थरावर पालकांच्या मीटिंग घेऊन त्यांना ही अभियानाबाबत माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
        महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त्त अभियानास जनता विद्यालयच्या वतीने सर्व प्रकारचे उपक्रम राबवून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त्त, आनंदायी वातावरणात घेण्याचा संकल्प प्राचार्य दत्ता पाटील नारळे व पर्यवेक्षिका तारा पाडळकर यांनी केला आहे.
close