साई साई… या वेड्या भक्ताला जवळी घे,
तुझ्या चरणी हरवू दे, मला तू आपुला घे।
साई साई… या वेड्या भक्ताला जवळी घे,
जग सगळं विसरू दे, फक्त तुझाच होऊ दे॥
जग हसतं वेडेपणाला, मला त्याची पर्वा नाय,
तुझ्या नावात हरवताना, बाकी काही उरलं नाय।
डोळ्यांत अश्रू, ओठी नाम, हृदयात तूच तू,
साई रे माझ्या श्वासात, प्रत्येक ठोका तू॥
कधी हसवतोस, कधी रडवतोस, परीक्षा तुझी भारी,
पण शेवटी कळतं साई, तुझी माया न्यारी।
फाटकी झोळी, मोकळा हात, पण मन सोन्यासमान,
तुझ्या कृपेच्या सावलीत, धन्य झालो मी जाण॥
श्रद्धेचा दीप पेटवला, सबुरीचा श्वास घेतला,
अंधारातल्या वाटेवर, तुझा हात मी धरला।
संकट आलं, भीती आली, डगमगला हा जीव,
“साई” म्हणताच शांत झालं, थांबलं सगळं भीव॥
साई साई जय साई, गगनात नाद घुमे,
भक्तीच्या या लाटांमध्ये, मन माझं बुडे।
शिर्डीची माती बोलते, दगडात देव दिसे,
साई नावाच्या मंत्राने, नशीब उजळून निघे॥
नको वैभव, नको सत्ता, नको जगाची कीर्ती,
फक्त तुझ्या चरणी राहू दे, हीच माझी प्रार्थी।
साई साई… या वेड्या भक्ताला जवळी घे,
जन्मोजन्मी तुझाच राहू दे, इतकंच मला दे॥
रमेश जेठे सर
अहिल्यानगर

