कर्तृत्ववान लेकीच्या स्मरणार्थ 'चैत्राली सन्मान' जाहीर; पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांचा गौरव
नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
लेखन, अभिनय, नेतृत्व आणि सामाजिक कार्यासारख्या विविध क्षेत्रांत आपल्या अफाट कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दिवंगत कु. चैत्राली इंदोरे हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा राज्याचा अत्यंत प्रतिष्ठेचा 'चैत्राली सन्मान' यंदा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी तथा डॅशिंग सनदी अधिकारी (IAS) मा. भाग्यश्री बानायत यांना जाहीर झाला आहे. एका कर्तव्यकठोर महिला अधिकाऱ्याचा गौरव पाहण्यासाठी आणि या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पुण्यात दिग्गज मान्यवरांची मांदियाळी भरणार आहे.
चैत्राली फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी एका नामवंत महिला सनदी अधिकाऱ्याला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे हे सलग दुसरे वर्ष असून, चैत्रालीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या ५ मार्चला हा शानदार वितरण सोहळा पार पडणार आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा!
या सन्मान प्रदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे भूषण, ज्येष्ठ समाजसेवक आणि पद्मश्री मा. पोपटराव पवार उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. तर या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'NDTV मराठी'चे संपादक मा. मिलिंद भागवत असणार आहेत. याशिवाय, पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मा. सुरेखा भणगे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवणार आहे.
कधी आणि कुठे?
हा बहुचर्चित सोहळा गुरुवारी, ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्याच्या टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल येथील 'गणेश ऑडिटोरियम'मध्ये रंगणार आहे. तत्पूर्वी सायं. ४.३० वाजता मान्यवरांचे चहापान व स्नेहमीलनाचा कार्यक्रम होईल.
प्रवेश मर्यादित, त्वरा करा!
या विशेष आणि भावपूर्ण सोहळ्यासाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत खालील क्रमांकांवर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी, असे आवाहन कार्यक्रमाच्या निमंत्रक तथा चैत्राली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा उत्तमकुमार इंदोरे यांनी केले आहे.
(संपर्क: ॲड. जिजाराम मुंडे - ९०११६८१११० | महेश नरहरे - ७७७००१००५५ | ॲड. ज्ञानेश्वर इंदोरे - ९७६२५०२८१९)

