अध्यक्षपदी अनिल मोहिते तर उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी; ग्रामीण भागातील छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा घेण्याचा निर्णय
शिर्डी प्रतिनिधी:
बागलाण तालुका छायाचित्रकार संघटनेच्या सचिवपदी सतीश नवसार यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच अध्यक्षपदी अनिल मोहिते तर उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची निवड जाहीर करण्यात आली. येथील बाबाज मंगलाष्टक सभागृहात तालुक्यातील छायाचित्रकार बांधवांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवळा तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ छायाचित्रकार अविनाश महाजन उपस्थित होते. बैठकीदरम्यान छायाचित्रकारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित छायाचित्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
✨ नव्याने निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – अनिल मोहिते
उपाध्यक्ष – दीपक सूर्यवंशी
सचिव – सतीश नवसार
सरचिटणीस – मयूर वाखारे
खजिनदार – उपेंद्र कोर
कार्यकारी सदस्य – स्वप्निल मांडवडे, प्रशांत सोनवणे, दिनेश भोई
संघटक – धनराज खैरनार, गणेश देसले
सल्लागार – अनिल देवरे, प्रवीण सोनवणे, योगेश पवार, सागर खरे, योगेश जाधव
सदस्य म्हणून निवड : सागर गांगुर्डे, मयूर शिंदे, पवन तांबे, अमोल अहिरे, गौरव पवार, केतन मांडवडे, ईश्वर आहिरे, योगेश जगताप, संदीप पाटील, गणेश शिंदे, विठ्ठल आहिरे, सनी वाडेकर, अमोल पाटील, नितीन धोंडगे, शशिकांत बिल्लाडे, देविदास चौधरी.
या वेळी तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीकडून छायाचित्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत संघटन बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
---

