shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीक्षेत्र आडगाव ते देहू पायी दिंडी सोहळ्याचे शिर्डीत उत्स्फूर्त स्वागत; वारकऱ्यांचा भक्तिमय वातावरणात सत्कार


संत तुकाराम महाराज बीजनिमित्त निघालेल्या आडगाव-देहू पायी दिंडीचा शिर्डीत मुक्काम; भाविकांकडून अन्नदान व सेवा

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजनिमित्त श्रीक्षेत्र आडगाव ते श्रीक्षेत्र देहू या पायी दिंडी सोहळ्याचे शिर्डी नगरीत मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. दिंडीचे संचालन करणारे श्री वारकरी हिलाल पाटील आणि त्यांच्या सर्व वारकरी मंडळींनी मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) शिर्डीत मुक्काम केला. यावेळी शिर्डीकरांनी या वारकरी बांधवांची मनोभावे सेवा केली.
या भक्तीमय प्रसंगी आसारामजी वारे, तुकाराम वारे आणि गणेश पांडसे यांच्या वतीने सर्व वारकरी मंडळींसाठी भोजन आणि राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, शिर्डीतील विविध मान्यवरांच्या हस्ते दिंडीतील प्रमुखांचा आणि वारकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी युवा नेते नानासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथजी थोरे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक हिम्मतराव होळकर, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब वाघमारे आणि पत्रकार संजय महाजन उपस्थित होते.
तसेच, अन्नदाते आसारामजी वारे, तुकाराम वारे, गणेश पांडसे यांच्यासह द्वारकानगर येथील पहिल्या गल्लीतील सर्व मित्रमंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. तुकोबारायांच्या गजराने आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीने शिर्डीत अत्यंत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
close