विद्यार्थी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्नेहसंमेलन उत्साहात
वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) : गुंडेगाव येथील श्री समर्थ ज्यूनियर महाविद्यालयातील १२ वी सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांचा आयोजित निरोप समारंभ महाविद्यालयाच्या प्रांगणात भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे विश्वस्त तथा बियाणे व खते संघटनेचे जिल्हा अध्यक्ष छबुराव हराळ होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ अकॅडमी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ कळमकर,कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख,ज्येष्ठ समाजसेवक श्री राजाराम भापकर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षक संघटना अध्यक्ष रमाकांत बोठे,अनिल हराळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक भाषणात संस्थेचे प्राचार्य प्रा.सुनील इंगळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना मेहनत,चिकाटी व सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला. बारावी ही आयुष्यातील महत्त्वाची पायरी असून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध स्पर्धा,गुणवंत,खेळाडू विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यीनींचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी गावातील माजी उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, सतीश चौधरी,संतोष धावडे, ह.भ.प.महादेव माने महाराज, वामन जाधव गुरुजी,ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल भापकर गुरुजी, शिवनाथ कोतकर,उद्योजक गणेश हराळ,प्रदीप भापकर,पत्रकार संजय भापकर व दादासाहेब आगळे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन करत आपल्या भावना व्यक्त केल्या व महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ कळमकर यांनी सांगितले की आजपर्यंत महाविद्यालयातून सुमारे १७०० विद्यार्थीनी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आहेत. संस्थेकडून गावातील गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व निःशुल्क मदत केली जात आहे.मात्र गावकऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याची गरज असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.तर पोलिस उपनिरीक्षक देशमुख यांनी मोबाईल व सोशल मिडिया पासून दूर राहिले पाहिजे तुम्ही शिक्षणाच्या या महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलात हे फक्त तुमच्या मेहनतीचे,शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे फलित असल्याचे त्यांना सांगितले.बारावी परीक्षा ही फक्त परीक्षा नाही,तर तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवणाऱ्या यशाचा पायरी आहे.कठोर परिश्रम,आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असे प्रतिपादन केले व पुढील शैक्षणिक प्रवासासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहन दिले.
तसेच या शैक्षणिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनिल इंगळे, प्रा.फिरोज पठाण,प्रा.ज्ञानेश्वर हराळ, प्रा.सचिन दारकुंडे,प्रा.माऊली माने,प्रा.राजेंद्र राऊत,श्रीमती सोनाली सरोदे,श्रीमती उजमा शेख, सोमनाथ कळमकर,श्रीमती वर्षा पठारे, ज्ञानदेव मोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रा.फिरोज पठाण यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.ज्ञानेश्वर हराळ यांनी आभार मानले.

