shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उस्थळ दुमाला येथील ग्रामस्थ व शेतकरी संघटना यांचे वतीने स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

नेवासा:- तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील ग्रामस्थ व शेतकरी संघटना यांचे वतीने स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झालंने संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचे सावट पसरले असून राजकारणातील एक झंझावात नेतृत्व आणि कुशल असा प्रशासक म्हणूनचं त्यांची ओळख होती.त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे असे मत शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाध्यक्ष त्रिंबकराव पाटील भदगले यांनी व्यक्त केले आहे.

अजित दादा पवार हे कुशल प्रशासक च नव्हे तर ते एक शेतकऱ्यांसाठी जमिनीवरचा नेता म्हणून ही त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या काळात अनेक धाडसी निर्णय राज्याच्या विकासासाठी घेतले होते.हसामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ ही कायम स्मरणात राहील. असे ही त्रिंबक पा.भदगले यांनी म्हटले आहे.
close