श्री साई संस्थान कामगारांचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न ना. राधाकृष्ण विखे पा. व डॉ सुजय विखे पा. यांच्या विशेष प्रयत्नांतून तसेच संस्थान अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने अखेर मार्गी लागल्याचा मनस्वी आनंद - चेअरमन विठ्ठल पवार
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थानमधील कामगारांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला 'सेवा प्रवेश नियम' तसेच १०:२०:३० ही 'आश्वासित प्रगती योजना' लागू करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या यशाबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप-मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानच्या कामगारांचे सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या विशेष प्रयत्नांना यश आले असून, कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
तसेच, या प्रक्रियेत श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे मॅडम आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशासकीय पातळीवर हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.
या निर्णयाचे स्वागत करत श्री साई संस्थान एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन श्री. पोपटराव कोते आणि संचालक मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कामगारांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि संस्थान अधिकाऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे मार्गी लागला आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.
– विठ्ठल पवार (चेअरमन, श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी)
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सभासद आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

