shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजमाता जिजामाता उद्यान लवकरच होणार खुले, उपनगराध्यक्ष यांनी केली पाहणी...

आमदार समाधान आवताडे व माजी प्रशांतराव परिचारक यांनी जिजामाता उद्यान विकसित करण्यासाठी दिला होता निधी

पंढरपूर : पंढरपूर नगर परिषदेची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमाता जिजामाता उद्यान असून सदर उद्यान विकसित व्हावे म्हणून आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सुमारे दोन कोटी 75 लाख या बागेसाठी मागील दोन वर्षे पूर्वी उपलब्ध करून दिले होते त्यानुसार सदर उद्यानाची काम अंतिम टप्प्यात असून लवकरच शहरातील नागरिकांना व बालगोपाळांना हे उद्यान उपलब्ध होणार आहे. उद्यान सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असून उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी जिजामाता उद्यानाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

उपनगराध्यक्ष  महादेव धोत्रे यांनी राजमाता जिजामाता उद्यान येथे नगरसेवकासमवेत भेट दिली यावेळी उद्यान परीक्षक आशिष राजोबा यांना पंढरपूर शहरातील नागरिकांना लवकरात लवकर उद्यान खुले करून देण्याच्या दृष्टीने अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत जेणेकरून ही बाग शहरातील नागरिकांना व बालगोपाळांना खेळण्यासाठी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आमदार महोदय यांनी या उद्यानासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी सांगितले
यावेळी गटनेते वासुदेव बडवे,  आरोग्य समिती सभापती व गटनेते सुजितकुमार सर्वगोड, पाणी पुरवठा सभापती अमोल डोके, नगरसेवक अँड सुनिल वाळूजकर, माजी नगरसेवक ॲड गुरुदास अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते शरद माने, गणेश शिंदे, मालोजी शेंबडे, शंकर सुरवसे  उपस्थित होते.

जिजामाता उद्यानाची पाहणी करताना उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक गटनेते वासुदेव बडवे,  आरोग्य समिती सभापती व गटनेते सुजितकुमार सर्वगोड, पाणी पुरवठा सभापती अमोल डोके, नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर.
close