छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी... सतिश लोखंडे.
छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार भवन भाग्यनगर येथे शिव जन्मोत्सव सोहळा २०२६ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला . या शिवजन्मोत्सव सोहळ्या निवड झालेल्या 151 कुटुंबांना संस्थापक अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते १५१ कुटुंबाला शिवस्मारक व भगवा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सदाशिवराव जाधव साहेब, बालाजी महाराज जाधव , अँड सदानंद सोनुने साहेब , हे प्रामुख्याने उपस्थित होते. 19 फेब्रुवारी हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धर्मवीर छावा संघटनेचे वतीने " शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात " हा सामाजिक व राष्ट्रभक्ती जागवणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवरायांचे विचार स्वराज्यांची प्रेरणा , राष्ट्रभक्ती, रुजवण्याचा आणि समानता सामाजिक सलोखा , व एकात्मता निर्माण करण्याचा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे असे संस्थापक अध्यक्ष मा . गणेश उगले पाटील यांनी जमलेल्या समुदायास संबोधित केले यावेळी अंकुश सकुंडे पाटील , गणेश बनसोडे, मीनाताई कड (महिला जिल्हाध्यक्ष) सरला ताई लोखंडे ,अँड ईश्वर नरवडे , भाऊसाहेब बोरसे , सुर्यप्रकाश जाधव , (जालना जिल्हा अध्यक्ष) गणेश सोळुंके , तेजस नागरे शिवाजी बोरसे , सचिन गोरे , गजानन गेंडे , रावसाहेब देवरे , कारभारी कड , इत्यादी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

