shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वर्गीय अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय मोर्शी येथे सिकलसेल तपासणी.

मोर्शी प्रतिनिधी:- उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत स्वर्गीय अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय मोर्शी येथे सिकलसेल या आजाराची तपासणी वर्ग 8 व वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांची करण्यात आली. अरुणोदय विशेष मोहीम अंतर्गत सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सिकलसेल पूर्णतः नाहीसा करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांचे समुपदेशन व औषधोपचार केल्या जात आहे.

या मोहिमे अंतर्गत झिरो ते 40 वयोगटातील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून घ्यायची आहे ही मोहीम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांच्या  मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून  या तपासणी शिबीर स्थळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री ए. डी. जुनघरे सर , शिक्षक प्रतिनिधी श्री डी. बी. ठाकरे सर, वर्ग 8 व वर्ग 9 चे वर्गशिक्षक श्री एस. ए. टिक्कस, श्री डी. एन. सर्जे 
कुमारी धांडे मॅडम,कुमारी करडे मॅडम, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे
       कर्मचारी श्री आशिष पाटील, श्री प्रकाश मंगळे, श्री विनय शेलुरे, श्री प्रशांत बेहरे, लुंबिनी साने, नम्रता ठाकरे आदी मंडळी उपस्थित होते.
close