धसई (जि. ठाणे):
महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. नं. २९३४ (संलग्न – शासन मान्य राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र) यांचे राज्यस्तरीय अधिवेशन आज किसन बाबा विद्यामंदिर, धसई (जि. ठाणे) येथे मोठ्या दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान संघटनेचे मुख्य मार्गदर्शक व सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक श्री. एन. एस. देशमुख यांनी भूषविले. राज्य शाखेचे सरचिटणीस डॉ. डी. एस. पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अधिवेशनास राज्य शाखेचे पदाधिकारी, २१ जिल्ह्यांचे अध्यक्ष व सचिव, सक्रिय कार्यकर्ते तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अधिवेशन खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडले.
या अधिवेशनात संघटनेच्या नवीन राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले असता सभागृहातून कोणतेही नाव पुढे आले नाही. यावेळी डॉ. डी. एस. पवार (अमरावती) यांचीच अध्यक्षपदी निवड करावी, असा एकमुखी सूर उमटला व एकमताने त्यांची राज्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच
सरचिटणीस: पुरुषोत्तम अडेप (अहिल्यानगर)
कार्याध्यक्ष: श्री. प्रदीप चंदे (बिनविरोध)
कोषाध्यक्ष: सतीश कांबळे (रत्नागिरी)
उपाध्यक्ष: दीपक गोतमारे (नागपूर) व लक्ष्मण मराठे (धुळे)
यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अधिवेशनास १५० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच अमरावती जिल्ह्यातून डॉ. एस. सी. माणिकपुरे यांचीही उपस्थिती लाभली.
राज्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
— आयोजक
श्री. प्रदीप चंदे
कार्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना
(र. नं. २९३६)

