shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझे गाव ,माझा अभिमान.- संस्कार आणि संस्कृतीचा वारसा सांगणारे:- खर्डा


 खर्डा हे केवळ एक गावाचे नाव नाही तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या टोकावरील सोलापूर बीड धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवरील ऐतिहासिक एक जिवंत संस्कृती आहे लहान मोठ्या टेकड्यांनी वेढलेल्या कौतुका नदीच्या खोऱ्यातील सुपीक माती आणि कष्टाळू हाताने वसलेले हे गाव आज प्रगतीच्या वाटेवर वेगाने धावत आहे.

 माझ्या खर्डा गावचा इतिहास इथली माणसं इथला निसर्ग यावर लिहिताना शब्दही अपुरे पडतात 
*ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा*
 खर्डा गावाला एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे गावाच्या मध्यभागी असणारी निंबाळकरांची गडी गावाची रचना .गडी .पासून जाणारे रस्ते गावात असणाऱ्या वेगवेगळ्या गल्ल्या गडी जवळील ब्राह्मणवाडे पाटलांची वाडे माळ्यांची सुतारांची लोहारांची कोळ्यांची चांभारांची घरे .बारा बलुतेदारची घरे आहेत . निंबाळकरांच्या गढी पासूनच सुरू होतात गावच्या गल्ल्या . गावात असणारी प्राचीन मंदिरे मठ मज्जिद गावातील प्राचीन वाडे प्राचीन पाण्याचे बारव पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर गावचा झालेला विस्तार खर्डा गावाला असणारी तटबंदी बुरुज तटबंदीच्या बाहेर  किल्ल्याजवळ हरिजन वाडा गावाच्या पश्चिमेला प्रवेशद्वारा जवळच वडार वाडा कौतुका नदीच्या पलीकडे कानिफनाथांच्या पायथ्याला निंबाळकरांच्या छत्री जवळ ओंकारेश्वर यांच्या छायेत वसलेले शुक्रवार पेठ गावाभोवती असणारी प्राचीन शिवमंदिरे गावाच्या जवळच असणारी नागोबाची वाडी गवळवाडी दरडवाडी मोहरी बाळगव्हाण बाधखडक सातेफळ काही अंतरापासून धाराशिव सोलापूर बीड जिल्ह्याच्या सरहद्दी गावातील बाजारपेठ कापड बाजार धान्य बाजार सोन्या चांदी साठी प्रसिद्ध असणारी सोनार गल्ली मुसलमान मोहल्ला बंगला गल्ली व खडकपुरा 
 गावात गावाभोवती असणारी शिव मंदिरे ह भ प सिताराम बाबाचा गड भगवान बाबांचा कृपाप्रसाद माऊली महाराज व गीते बाबांचा आशीर्वाद खर्डा गाव म्हणजे पंचक्रोशीतील आध्यात्मिकतेचे शक्ती केंद्र आहे आषाढी कार्तिकी एकादशी श्रावण नवरात्री होळीच्या दिनी कानिफनाथ ची यात्रा ऐतिहासिक पोळा सण नागपंचमी दीपावली मोहरम गणपती उत्सव हिंदू मुसलमानांसाठी गावात पर्वनिय असते गावातील जुन्या वाड्यांच्या भिंती आजही इथल्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देतात 
 कृषी आणि निसर्गसंपदा समवेतच माझ्या गावाचा मुख्य कणा .म्हणजे शेती इथला शेतकरी पहाटेच्या प्रहरी
 नांगराचा फाळ हाती धरून मातीशी नाते सांगतो माझ्या गावात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात मोठे मोठे विहिरी आहेत पूर्वी मोटेच्या .साह्याने शेत फुलवणारे शेतकरी इथल्या गावाचा बळीराजा होता विहिरीवरील मोटेची जागा इंजिन आणि व विद्युत मोटारीने .घेतली मोटे .वरचं गाणं कुई - कुई वाजणारा चाक तरुण पिढीच्या कानी त्याचा मंजूळ आवाज पडत नाही.शेतात पिकणाऱ्या धान्यासाठी गावातच बाजारपेठ उपलब्ध होतील बार्शी सोलापूर नगर कडे बैलगाड्यातून शेतातला पिकलेल्या मालाची ने-आण होत होती खर्डा गावात मोठी बाजार पेठ होती .
 खर्डा .गावाबद्दल माहिती सांगणारे वयोवृद्धआता इतिहास जमा झाले आहेत ते सांगायचे इथे नगरपालिका अस्तित्वात होती पुढे ग्रामपंचायत झाली गावातील सण उत्सवात गावातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांना मान देऊन मानकरी केले होते पोळ्याच्या सणाला कानिफनाथ च्या कठाळ्याचा मान वडार समाजाला होता कानिफनाथ चा कठाळ्या जोड विशीतून पुढे गेल्याशिवाय पोळा फुटत नव्हता 
 वाद्य वाजवण्याचा वेशीला आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याचा मान हरिजन बांधवाना दिलेला होता कानिफनाथ च्या यात्रेतील शासनकाट्या . सुतारनेटावरून निघणार संदल बैलगाड्या हा कार्यक्रम पाहण्यासाठी खेड्यापाड्यातून लोक गावात येत होती नागपंचमी दसरा दसऱ्यातील येणारा देवीचा पलंग विविध सणासाठी विविध जाती धर्मातील लोकांना मान देऊन गावात सलोखा नांदेल .याची पूर्वजनांनी काळजी घेतली होती
 खर्डा गाव शेती व्यापार बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होते अलीकडे शिक्षणाचे केंद्र बनले आहे प्रार्थमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाची इथे सोय झाले आहे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे आज माझ्या गावातील मुले मुली शिक्षण घेऊन उंच भरारी घेत आहेत डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक प्राध्यापक पत्रकार सिने कलावंत खेळाडू पोलीस इंडियन आर्मी आधी क्षेत्रासह प्रशासकीय सेवेतून मोठ्या पदावर कार्यरत आहेत काही मुलांनी खर्डा गावातच व्यवसायामध्ये जम बसवला आहे गावातील वयोवृद्धांनी अनुभवाची शिदोरी नव्या पिढीकडे सुपूर्द करत एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे 
 लोकजीवन आणि माणुसकीची नाती खर्ड्याच्या मातीमध्ये एक वेगळाच .जिव्हाळा आहे इथली माणसं कष्टकरी असली तरी मनाने खूप श्रीमंत आहेत गावात हिंदू मुसलमान बंधू भावनेने राहतात एकता गावात नांदते दीपावली मोहरम सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात 
 सणासुदीला चौका चौकात वयोद्धापासून तरुणांमध्ये गप्पांचा .फड रंगताना दिसतो . सामाजिक व राजकीय गप्पांमुळे गावातील तरुणांनी जिवंतपणा टिकून ठेवला आहे आधुनिकतेची कास धरून गावाचा विकास होताना दिसत आहे गल्लोगल्ली रस्ते . गटारी दिवाबत्ती . पिण्याच्या पाण्याची सुविधा .आधी सुविधांनी गावाने कात टाकलेली आहे माझ्या गावातल्या नव पुढार्‍यांमध्ये गावाच्या विकासाची इर्षा निर्माण झालेली दिसत आहे गल्ली साठी प्रभागासाठी काहीतरी करावं ह्या जिद्दीने नव पुढारी झपाटलेला दिसत आहे 
 गावाच्या बाहेर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत गावाच्या शेजारी विद्युत मंडळाचे मोठे सबस्टेशन झाल्यामूळे लाईट कधीच जात नाही गावात विविध बँकातून आर्थिक व्यवहार होताना दिसत आहेत
 माझं खर्डा गाव डिजिटल गाव सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील तरुण आपल्या गावाची माहिती जगभर पोचवत आहेत 
 शहरात झगमगट कितीही राहिला तरी मनाच्या कोपऱ्यात खर्ड्याच्या मातीचा सुगंध नेहमी दरवळत असतो पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणाऱ्या प्रार्थनेचा सूर आजही कानात जसा ना तसा घुमत आहे हे सर्व माझ्या खर्डा .गावाचे वैभव आहे 
 गावगाडा बदलला असेल पण .खर्डेकरांच्या मनातील प्रेम आणि माणुसकी आजही तीच आहे 
खर्डा गाव गुलजार
वसले आहे कौतुकेच्या काठावर
माझ्या गावातील भुईकोट किल्ला मराठ्याच्या लढाईचा साथीदार ठरला आहे इथेच मराठ्यानी निजामाचा शेवट केला इथे लढले मराठे वीर बहाद्दर त्या मातीला भगव्या साठी लढणाऱ्या वीरांना प्रणाम
*लेखक*
*मुख्याध्यापक*.
श्री श्रीमंत तुळशीराम लष्कर (पत्रकार) दै. पुढारी
खर्डा ता जामखेड जि अहिल्यानगर
close