ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
माझ्यावरील भ्याड हल्ल्याला आज वीस दिवस झाले. तीन पैकी दोन सापडले मग तिसरा का सापडत नाही. याचे उत्तर पोलिसांना ठाऊक नसले तरी मला ठाऊक आहे. हा तिसरा फरार हल्लेखोर म्हणजे माझ्यावरील हल्ल्याची सुपारी घेणारा गुन्हेगार आहे. त्याला अटक झाली की सूत्रधाराचा चेहरा बेनकाब ( उघडा ) होणार. सूत्रधार हे सराईतपणे हल्ले घडवून आणणारे राजकीय व्यक्ती आहेत. त्यातील एकाने स्विकृत नगरसेवक पदासाठी रविंद्र चव्हाण यांच्याकडे सेटिंग लावली आहे. त्याचे नाव उघडकीस आले तर स्विकृत नगरसेवक पद गमवावे लागेल. याचसाठी स्विकृत नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडेपर्यंत तिसरा हल्लेखोर मिळू नये,याची व्यवस्था सूत्रधाराने केली आहे. सरिता खानचंदाणी आत्महत्येच्या प्रकरणातही याने उमेदवारी मिळून निवडणूक लढवेपर्यंत ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित ठेवले व भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. इथेही त्याची पुनराव्रृत्ती होत आहे. सराईत गुन्हेगारांप्रमाणे ही ट्रिक वापरली जात आहे. तिसरा आरोपी पढवलेल्या पोपटा प्रमाणे स्टोरी रचून यांना वाचवेल? असा त्यांना भ्रम असला तरी अटकेतील दोन आरोपीनी सत्य ओकलेच असेल.
एक गुंड प्रवृत्तीचा आरोपी वीस दिवसात पोलिसांच्या हाती लागू नये ? हे सद् रक्षणाय, खलनीग्रहणाय! बिरूदावली मिरवणाऱ्या पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेस खाचितच शोभणारे नाही.
मी आज वयाच्या सत्तरित जायबंद झालेला हात गळ्यात बांधून न्यायासाठी धडपडत आहे, न्यायासाठी टाहो फोडत आहे. काल याच अवस्थेत गळयात हात बांधून आधारवाडी कारागृहात ओळख परेडसाठी जावे लागले. ही भूषणास्पद बाब आहे का ? मी माझ्या दुखण्याचे, वृद्धत्वाचे वा पत्रकरितेचा कधीच बाऊ केला नाही. मी असमर्थ वा लाचार नाही, परावलंबी नाही, मी माझी लढाई one man armi प्रमाणे लढत आलो आहे. माझ्यावरील हल्ला हा माणुसकीला काळिमा फासणारा, संविधानाचे मूलभूत हक्क पायदळी तुडवणारा आहे. त्याच्या रक्षणासाठी माझी ही एकाकी लढाई आहे. हॊ, खऱ्या अर्थाने एकाकी लढत आहे. मी सनदशीर मार्गानेच लढणार. जशी मानवी हक्क आयोगापुढे दाद मागितली तशी, पोलीस तक्रार प्राधिकरण, उच्च न्यायालय व त्याही पुढे जाऊन न्याय मिळवणारच.
आजवर मी समाजातील अपप्रवृत्ती व भ्रष्टाचारा विरोधात लढलो व जिंकत आलो, ही तर माझी वैयक्तिक लढाई आहे, ती जिंकल्याशिवाय मी थांबणार नाही.
*आत्ता कसोटी माझी नाही तर पोलीस खात्याची आहे. ते खऱ्याला साथ देतात की अप प्रवृत्तीशी हात मिळवतात*
मालवणी माणूस देव भोळा नसतो, तो कष्टकरी, प्रामाणिक व आपल्या कुल दैवतांवर अगाध श्रद्धा ठेवतो. तो पाप्याचा नायनाट व पुण्यवानांना साथ देतो. माझ्यावरील हल्लेखोर व सूत्रधारांचा बंदोबस्त करण्याची शक्ती त्याच्यात नक्कीच आहे. माझ्या वरील हल्ल्याच्या तारखेपासून तीन महिन्यात जर त्यांचे वाटोळे झाले नाही तर मी त्याचे नाव बदलून टाकेल.
एक गाणे आहे
दुनियामे है तेरा बडा नाम
आज तुझसे पड गया काम
मेरी बिनति सुने तो जानू
राम नाही तो कर दूंगा
सारे जगमे तुझे बदनाम..
मग या भाडखाऊ भडव्यांची काय बिषाद?

