shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीत बुधवारी होणार श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा.

वडापुरीत बुधवारी होणार श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा.
 इंदापूर ( वडापुरी):

 वडापुरी (ता- इंदापूर ) येथील श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा चैत्र शुद्ध अष्टमी बुधवार दि
 २५ मार्च २०२६ रोजी व गुरुवार दि. 26 मार्च 2026 रोजी संपन्न होणार असल्याची माहिती समस्त ग्रामस्थ व श्री काळभैरवनाथ यात्रा कमिटी वडापुरी यांच्या वतीने देण्यात आली.
 श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडापुरी या गावांमध्ये 
 श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेमध्ये  बुधवार( दि. 25 मार्च)  सकाळी 8 वाजता श्री काळभैरवनाथ देवाचा अभिषेक होणार असून  सकाळी 10 ते 12 या वेळेत नलवडे परिवार यांचा मानाचे निशाण तसेच सायंकाळी 6 वाजता श्रीनाथ मंदिरातून श्रींचा छबिना व पालखीचे प्रस्थान, सायंकाळी 7 ते ८:३० या वेळेत मानाच्या शेरण्या, रात्री 9 वाजता शोभेच्या दारूचा उत्सव, त्यानंतर रात्री 9 वाजता श्रीं चा भव्य मिरवणूक  छबिना निघणारा असून रात्री 12 वाजता श्रीनाथ मंदिर येथे गुरु शिष्य भेटीनंतर छबिना  श्री काळभैरवनाथ मंदिर येथे छबिना दाखल झाल्या नंतर महारती संपन्न होणार आहे. त्यानंतर रात्री १ वाजता कैलास सावंत गोतवंडीकर सोबत रील स्टार अमिषा पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तसेच दुसऱ्या दिवशी 26 मार्च रोजी लोकनाट्य तमाशा चा हजेरीचा कार्यक्रम सकाळी 8 ते 10 वेळात होणार आहे.त्यानंतर भैरवनाथ मंदिर शेजारील हनुमान मंदिरात 10 ते 12 या वेळेत रामनवमी निमित्त कीर्तन व फुलांचा कार्यक्रम आणि महाप्रसाद संपन्न होणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न होणार आहे. यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रींची सांगता समारंभ होणार आहे.

 या यात्रेमध्ये वडापुरी, पंधारवाडी, झगडेवाडी, गोखळी, हनुमानवाडी, रामवाडी तसेच पंचक्रोशीतील वाड्यावस्त्या  येथील ग्रामस्थ, सासरी नांदायला गेलेल्या माहेरवासिनी,  कामासाठी बाहेर गेलेले ग्रामस्थ या यात्रेला वर्षातून एकदा उपस्थित राहून श्री काळभैरवनाथ व श्री नाथांची मनोभावे पूजा करत असताना दिसून येतात.
----------------------
 वडापुरी (ता- इंदापूर) येथे श्री काळभैरवनाथ मंदिर समोर यात्रेची नियोजन करताना समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी.
close