shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विमलबाई लक्ष्मण जाधव यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन



जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर; आज सायंकाळी मोसम नदीच्या तिरावर होणार अंत्यसंस्कार

नगर प्रतिनिधी:
ताहाराबाद येथील रहिवासी असलेल्या विमलबाई लक्ष्मण जाधव (वय ७५) यांचे आज मंगळवार (दि. २४ मार्च) रोजी सकाळी ९.५५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ताहाराबादसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विमलबाई या अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ आणि सात्विक वृत्तीच्या होत्या. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे गावात त्यांना आदराचे स्थान होते. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) सायंकाळी ५.०० वाजता ताहाराबाद येथील मोसम नदीच्या तिरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात लक्ष्मण परशराम जाधव, केदा जाधव, वामन जाधव, बाळू जाधव, सिताराम जाधव, चिंतामण जाधव, सुरेश जाधव, दादाजी जाधव, जितेंद्र जाधव, भुषण जाधव, पंकज जाधव यांच्यासह मोठा आप्त परिवार आहे. घरातील एका ज्येष्ठ आधारवडाचे छत्र हरपल्याने समस्त जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
close