धर्म टिकला तर आपण टिकू - मनोहर मामा भोसले.
वडापुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलन संपन्न.
इंदापूर (वडापुरी):
येणारा काळ खूप संघर्षमय आहे. तुम्ही आणि मी एक राहणं जरुरी आहे.आणि केवळ आणि केवळ आर एस एस सारखी संघटना आपल्याला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य करत आहे.तुम्ही मी व आपण सर्वजण धर्मासाठी झिजत असलो. तर एकीने रहा,एक राहिलातर तर सेफ रहाचाल, स्वतःचे संरक्षण करायला शिका,कपाळाला गंध लावायला शिका, धर्म टिकला तर आपण टिकू अशा शब्दात वडापुरी(ता. इंदापूर) येथे विराट हिंदू संमेलन मनोहर मामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी
( दि. 22 मार्च2026) विराट हिंदू संमेलनात संबोधित करताना मनोहर मामा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बारामती जिल्हा सह कार्यवाह संतोष गाडे,आणि मातृशक्ती वृषालीताई पांडकर,
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद कामठे, संत माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावे वंशज ह भ प बाळासाहेब बोधले, तसेच वडापुरी, अवसरी, भांडगाव, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ, काटी, रेडा, वरकुटे खुर्द, पंधारवाडी येथील सकल हिंदू समाज उपस्थित होता.
तसेच मनोहर भोसले पुढे म्हणाले की, हिंदू इतका झोपलेला आहे की तो कधी जागा होईल असे वाटत नाही. हिंदूंच्या कार्यक्रमाला आपण बसलो असता एकाही हिंदूंच्या कपाळाला गंध दिसत नाही हे दुःख आहे. कारण तो हिंदू आहे सनातनी आहे हे दिसला पाहिजे. इतर धर्मामध्ये धर्माबद्दल देवा बद्दल प्रेम दिसते ते आपल्या मध्ये दिसत नाही. आपल्यामध्ये आपल्या देवाला आपल्या धर्मगुरुला नाव ठेवतो. खरंच आपण आपला धर्म वाचवतो का बुडवतो हे काळच ठरवेल. जगाला विचारण्यापेक्षा आपल्या अंतरमनाला विचारलं पाहिजे. सनातनी सप्त ऋषींची संतान आहे. अतिशय हुशार आहे.तुम्हाला अंतर्मनात इतके ज्ञान आहे ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी वापरत आहात.
या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज वडापुरी, अवसरी, भांडगाव, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ, काटी, रेडा, वरकुटे खुर्द, पंधारवाडी यांच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी पंधारवाडी येथील दांड पट्टा पथक यांनी आपले कौशल्याचे सादरीकरण केले.
याप्रसंगी जिल्हा सह कार्यवाह संतोष गाडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, हिंदू समाजातील हिंदूंना समरसता आणि समानता आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत आहे. या संघाची स्थापना डॉक्टर केशव हेडगेवार यांनी केली असून या संघाला 100 वर्ष झाले त्याबद्दल वडापुरी येथे विराट हिंदू संमेलन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले.
यावेळी मातृशक्ती व पर्यावरण या विषयावर वृषालीताई पांडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद कामठे, संत माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावी वंशज ह भ प बाळासाहेब बोधले यांनी
यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना घळके यांनी केले तर आभार महेश बोधले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत जगताप यांनी केले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सागर गोसावी, सचिन केसकर, तेजस पाटील, वैभव कोकाटे, रोहन घोगरे, गणेश काटकर, प्राप्तिस बर्गे, शुभम गोसावी यांनी यशस्वी प्रयत्न केले..
---------------===
फोटो ओळ : वडापुरी तालुका इंदापूर येथे विराट हिंदू संमेलना प्रसंगी गुरुवर्य मनोहर मामा भोसले व इतर मान्यवर.

