shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिताताई खरात यांचा महाराष्ट्र समाज रत्न* पुरस्कार 2026 देऊन सन्मानित .

तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिताताई खरात यांचा महाराष्ट्र समाज रत्न* पुरस्कार 2026 देऊन सन्मानित .
इंदापूर: महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  *महाराष्ट्र समाज रत्न* पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले.
 या वेळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी आईसाहेब,यशोधरा गोडबोले, मीरा नाईकले, रमेश गणगे,  मुख्य संपादिका स्मिता बाबरे ,जयदेव आबा गोपने परांडा, रंधवा साहेब, शिवाजी  पवार, दत्तात्रेय मिसाळ  हे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पुरस्कारला उत्तर देताना अनिताताई खरात म्हणाल्या की, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 तास चे मनःपूर्वक आभार .
निस्वार्थी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवरती आपण शाबासकीची थाप मारली त्याच्या कार्याचा गौरव केला सामाजिक कार्यकर्त्यांना कोणतीही अपेक्षा नसते त्यांच्या कार्याचा गौरव करणे हेच त्यांच्यासाठी खूप मोठे फळ असते आणि तेच महाराष्ट्र पोलीस न्यूज ने केले , पाठीमागील दोन वर्षांपूर्वीही आपण मला पुरस्काराने सन्मानित केले होते त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 

तसेच चालू परिस्थितीवर बोलायचे झाले तर मी माझ्या बंधू-भगिनींना विनंती करेल की कोणत्याही भोंदूगिरीवर किंवा भोंदू बाबा वर विश्वास ठेवू नये .आपण देवावर विश्वास ठेवा पण ती श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी .  कोणावर किती विश्वास ठेवायचा हे माझ्या महिला भगिनींनी ठरवून घेतले पाहिजे .आपण जर त्या भोंदूपर्यंत जाण टाळलं किंवा अशा भोंदू बाबांनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्या तत्परिने आपण त्याला चप्पल दाखवली तर त्यामुळे अशा भोंदू बाबांचा विश्वास वाढणार नाही व दुसरे अशोक खरात सारखे नराधन तयार होणार नाहीत.आपण अशा भोंदू बाबा वर वेळ व पैसा वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ आपण सामाजिक काम करण्यात किंवा गोरगरीब मुलं ज्यांना पैशासाठी आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते अशा माझ्या विद्यार्थ्यावर खर्च केला तर या मुलांच्या समाधानातून आपल्याला जो आशीर्वाद मिळेल तेवढा कोणत्याच भोंदू बाबाकडे मिळणार नाही किंवा कोणा भोंदू कडे जाण्याची किंवा कोणाचे पाय धुण्याची गरज लागणार नाही. आपण स्वतः सक्षम व्हा.   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. त्यांनी आपला खूप मोठा अधिकार दिला. त्याचा वापर करा.  भोंदू बाबांच्या नादी लागण्यापेक्षा सुशिक्षित पिढी घडवण्याकडे लक्ष द्या,  पंधरा दिवसापूर्वीच महिला दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. आपण महिलांचा सन्मान 365 दिवस करावा .पाठीमागील दोन-तीन दिवसापासून महिला विषयी खूप काही वाईट पाहण्यास व ऐकण्यास मिळत आहे .एका भोंदू बाबा मुळे माझ्या महिला भगिनींना बदनाम करू नका असे मी समाजातील लोकांना विनंती करते .तसेच महिलांनीही आपापसात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसू नये. कारण एक तर महिलांची संख्या समाजकारणात किंवा राजकारणात खूप कमी आहे आणि जर आपण एकमेकीवर आरोप प्रत्यारोप करत बसलात तर खूप अवघड आहे. एकमेकीच्या चुका काढण्यापेक्षा त्यांना त्या चुका एकांतात सांगा व महिलांची बाजू सक्षम करा एवढीच विनंती मी आजच्या कार्यक्रमानिमित्त करेल असे यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या.
close