shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्याहाळी शाळेत आणि परिसरात चिमण्यांचा किलबिलाट..जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून चिमण्यांसाठी घरटी , खाद्य व पाणी पिण्यासाठी पात्र बनवण्याची कार्यशाळा..

व्याहाळी शाळेत आणि परिसरात चिमण्यांचा किलबिलाट..

जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून चिमण्यांसाठी घरटी , खाद्य व पाणी पिण्यासाठी पात्र बनवण्याची कार्यशाळा..
इंदापूर: दिनांक 24 पुणे मॉडेल स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्याहाळी येथे जागतिक चिमणी दिवसाच्या उचित्य साधून पक्षीमित्र अर्जुन जाधव यांच्या माध्यमातून चिमण्यांसाठी घरटी , खाद्य व पिण्याच्या पाण्यासाठी ची पात्र बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक  रामकृष्ण निंबाळकर व पदवीधर शिक्षक प्रभाकर लावंड यांचे हस्ते अर्जुन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. 
       प्रसंगी जाधव यांनी चिमणी व पक्षी प्राणी यांना आधार देणे. त्यांच्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. या हेतूने गेली दहा वर्षापासून विनामूल्य पक्षी संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे काम करत आहेत. यावेळी टाकाऊ वस्तू बाटल्या , चमचे , रिकामी खोकी पाईप , तार , खिळे वापरून अतिशय दर्जेदार चिमण्यांसाठी घरटी खाद्यपात्र व पिण्याच्या पाण्यासाठी भांडी बनवून दिली. यामुळे मुलांना पक्षाविषयी व चिमण्यांविषयी आपुलकी निर्माण झाली. सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला भांडी बनवून घेतली.
close