जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
उपराष्ट्रपती झाल्यानंतर सी पी राधाकृष्णन तब्बल सहा महिन्यांनी महाराष्ट्रात आले व नागपूर येथे कार्यक्रम आटोपून दोन कार्यक्रमांकरिता लोकभवन मुंबई येथे आले.
राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असताना 'लोकभवन' हे 'राजभवन' होते !
नवे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी प्रथेप्रमाणे उपराष्ट्रपतींसाठी चहापानाचे आयोजन केले व मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांना चहापानाचा निमंत्रित केले.
राधाकृष्णन साहेब उपराष्ट्रपती झाल्यापासून त्यांना भेटण्याचा योग आला नव्हता.
आता जुने बॉस आले आहेत तर किमान त्यांनी आपले अभिवादन स्वीकारावे असे वाटत होते. परंतु 'प्रोटोकॉल' किंवा 'लाईन अप'मध्ये बसत नसल्याने त्यांना भेटणे शक्य नव्हते.
संध्याकाळी चहापानाच्या वेळी 'जल विहार' येथे उपराष्ट्रपती व राज्यपाल मुख्य हॉल मध्ये प्रवेश करताना अर्धा क्षण राधाकृष्णन साहेबांचे एका कोपऱ्यात लक्ष गेले आणि थोडा मार्ग वळवून ते नमस्कार स्वीकारण्यास जवळ आले. पाठीवर हात ठेवून लगेचच त्यांनी हॉल मध्ये प्रवेश केला. नवे राज्यपाल त्यांच्यासोबत चालत असताना देखील ते भेटण्यास पुढे आल्याने पुंडलिकासारखा आनंद झाला !!
व्हिडीओ ग्राफर संजय जाधव यांनी घाईघाईतच कॅमेरा सेट केला आणि त्यामुळे नऊ सेकंदाची ही हृद्य आठवण कॅमेरात कैद झाली !
000

