shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये ३१ मार्चपर्यंत मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर!

 संधीवात, मधुमेह ते मुळव्याध; अनेक आजारांवर मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन व अत्याधुनिक आयुर्वेदिक उपचार

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या मांची हिल वरील 'आश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल'मध्ये मोफत सर्वरोग निदान व आयुर्वेदिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून, जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे सर्जरी विभाग प्रमुख डॉ. एस. जी. खंडीझोड यांनी केले आहे.
या विशेष शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत निदान करून योग्य ते आयुर्वेदिक औषधोपचार केले जाणार आहेत.
या आजारांची होणार तपासणी:
 * संधीवात, पक्षाघात आणि मणक्यांचे विकार
 * मधुमेह आणि विविध त्वचा विकार
 * मुळव्याध, फिशर आणि भगंदर
 * डोळ्यांचे विकार, स्त्री रोग आणि बालरोग इत्यादी.
हॉस्पिटलमधील उपलब्ध अत्याधुनिक सुविधा:
रुग्णांना निसर्गरम्य वातावरणात उपचारांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये केवळ आयुर्वेदिक औषधोपचारच नाही, तर पंचकर्म उपचार, फिजिओथेरपी आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेची (ऑपरेशन) सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संपर्क:
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी रुग्णांनी ८९७५७८०८४८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
close