shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईची झळ; हॉटेल व्यावसायिक व साईभक्त मोठ्या चिंतेत!



गॅस पुरवठा नियमित करण्यासाठी राज्य नेतृत्वाशी चर्चा करा; भाजयुमोच्या निवेदनाद्वारे डॉ. सुजय विखेंना साद!

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी नगरीत सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या कृत्रिम टंचाईमुळे श्री साईबाबा संस्थानचे भोजनालय आणि शहरातील शेकडो हॉटेल-रेस्टॉरंट्सचे कंबरडे मोडले आहे. गॅसअभावी संस्थानचा लाडका 'बुंदी प्रसाद' वाटप थांबण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने भाविकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. या समस्येवर तातडीने राज्य पातळीवरून हस्तक्षेप व्हावा, यासाठी भाजयुमोचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील यांना साकडे घातले आहे.
शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी संस्थानचे भोजनालय आणि स्थानिक हॉटेल्स हाच आधाराचा मोठा स्रोत असतो. मात्र, नियमित गॅस पुरवठा होत नसल्याने या सर्वच यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहेत. ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आणि शिर्डीचे अर्थकारण सुरळीत ठेवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय नेतृत्वाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, अशी मागणी योगेश गोंदकर यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला शिर्डीसाठी गॅसचा मुबलक पुरवठा हा केवळ व्यावसायिकांचा नाही, तर थेट लाखो साईभक्तांच्या सुविधेचा प्रश्न बनला असून, यावर आता राजकीय पातळीवरून किती वेगाने हालचाली होतात, याकडे संपूर्ण शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.
close