shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत - इंग्लंड सेमीफायनलचा कणखर व्यूह आणि परिस्थितीची वास्तविक स्थिती

गतविजेता भारत टी-२० विश्वचषक विजेतेपद राखण्यापासून दोन पावले दूर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे आणि आता त्यांचा सामना इंग्लंडशी होईल. इंग्लंड सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्यांनी सुपर एट टप्प्यात त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताच्या मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता, परंतु ते पुनरागमन करण्यात यशस्वी झाले.

सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत आमनेसामने

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही सलग तिसरी वेळ असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना २०२२ मध्ये खेळला गेला होता, जो इंग्लंडने १० गडी राखून जिंकला होता. त्यानंतर सन २०२४ मध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते, जिथे भारताने विजय मिळविला होता. आता, दोन्ही संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येतील. सन १९८७ च्या वनडे विश्वचषकात उपांत्य फेरीत वानखेडेवर हे दोन्ही संघ खेळले असून त्यात इंग्लंडने बाजी मारली होती.
टि२० वर्ल्ड कप २०२६ च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होणार असल्याने या गडद आणि उत्कट सामन्याची पार्श्वभूमी आणि विश्लेषण असे : -

भारताने सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवत सेमीफायनलची जागा पक्की केली — सॅन्जू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या शानदार खेळीने संघाला विजयाकडे नेले. इंग्लंडने सुपर आठ मध्ये सलग तीन विजय मिळवत स्वतःला गटात अव्वल स्थानी नेऊन ठेवले.  त्यांचा गतिशील आणि प्रभावी खेळ आता मुंबईच्या वानखेडेच्या खेळपट्टीवर कसा होतो हे बघणे मनोरंजक ठरेल. गुरुवारी, ५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार आहे.

वस्तुनिष्ठ धोरणात्मक विश्लेषण
भारतीय संघाची ताकद आणि प्रश्नचिन्हे
भारताचे धोरण, बॅटिंग संतुलन व सामर्थ्यवान मिडल ऑर्डर वर आधारित आहे. अनुभवी फलंदाज आणि युवा खेळाडूंचा मिश्रित फॉर्म भारताला मजबूत बनवितो. मात्र ओपनिंगमध्ये अचूकता आणि सलामी आक्रमकता व सातत्य हे  अजून ठळकपणे दिसलेले नाही. त्यामुळे प्रारंभिक दबावात बळी गमावण्याचा धोका कायम आहे.
धोका : - अभिषेक शर्माचे अपयश संघाला मोठ्या प्रमाणात त्रस्त करत असून तो पॉवर प्लेमध्ये क्लिक झाला नाही तर नंतर मधल्या फळीवर दबाव येण्याचा धोका सतावतो.

 इंग्लंड संघ स्वरूप आणि आत्मविश्वास
गट साखळी नंतर इंग्लंडचा संघ अत्यंत आत्मविश्वासाने खेळत आहे, आणि त्यांचे स्टार अष्टपैलू खेळाडू आणि बॅटिंग लाइन आतापर्यंत  तणावाखाली चांगली कामगिरी करत आहे.
सॅम कॅरन आणि हॅरी बूक  यांचा फॉर्म इंग्लंडला सामन्यात आक्रमक आणि संतुलित खेळ देत आहे. इंग्लंडच्या संघाने भारतीय वातावरणात आणि मोठ्या स्टेडियममध्ये यापूर्वी खेळलेले असून त्यांच्या बऱ्याचशा खेळाडूंना आयपीएलचा अनुभव असल्याने मानसिक दबाव कमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
धोका : - पावरप्ले आणि स्पिनच्या समोर काही वेळा इंग्लंडची टॉप ऑर्डर ढासळली आहे, त्यामुळे नियमित विकेट्स गमावण्याची शक्यता वाढू शकते.

 खेळपट्टी व स्थानिक परिस्थितीचा प्रभाव
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः उच्च स्कोअरिंग आणि त्यात बदलत्या वेगाच्या गोलंदाजीस अनुकूल मानली जाते. मुंबईचे उष्ण वातावरण दोन्हीही खेळाडूंवर मानसिक व शारीरिक दबाव निर्माण करू शकतात, म्हणून प्रारंभिक नाणेफेक आणि पिळवळलेली रणनीती अत्यंत महत्वाची ठरेल. सरासरी धावसंख्या आजकाल उच्च फलंदाजीच्या संदर्भात असल्याने गोलंदाजीला आव्हान असू शकते. रन रेट वाढविण्याच्या युद्धात दोन्ही संघाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
मुख्य धोके आणि सामन्याची दिशा
 भारतीय संघासाठी संभवित धोके : -

सलामीच्या अचूकतेचा अभाव
स्पिनवर इंग्लंडचे प्रत्युत्तर
मध्य ओव्हरमध्ये गडी गमावणे
 इंग्लंड संघासाठी संभवित धोके:

टॉप ऑर्डरची अस्थिरता
भारताच्या डेथ ओव्हर्स आणि स्पिनवर नियंत्रण कमी पडणे
मुंबईचा उष्ण अडथळा आणि स्थानिक वातावरणाच्या दबावाखाली मानसिक दडपण
निष्कर्ष - वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून
भारत व इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल केवळ कौशल्याचा संघर्ष नाही तर मानसिक तणाव, रणनीती आणि परिस्थितीची सत्वपरीक्षच असेल. दोन्ही संघांचे फलंदाजी व गोलंदाजीचे स्वरूप वेगवेगळे आहे आणि परिस्थितीनुसार जो खेळावर नियत्रण ठेवेल , तोच संघ जिंकणार असं आजच्या घडामोडींवरून दिसते.

भारताची ताकद   : संतुलित बॅटिंग, डेथ बॉलीग, घरच्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव.

इंग्लंडची ताकद: आत्मविश्वास, आयपीएलचा अनुभव, आक्रमक अष्टपैलू खेळ. 

वरील सर्व बाबींचा विचार करता प्रत्यक्ष सामन्यात जो संघ सर्व संकटे व उद्भवणारे प्रसंग यांना व्यवस्थीत हाताळेल त्याला फायनलचे तिकीट मिळेल.

@डॉ.दत्ता विघावे               
     क्रिकेट समिक्षक
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close