shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळेवाडी नं १ शाळेत महिला दिनाचे औचित्य साधुन उत्साहात नवागतांचे स्वागत*

*काळेवाडी नं १ शाळेत महिला दिनाचे औचित्य साधुन उत्साहात नवागतांचे स्वागत*
           इंदापूर : जिल्हा परिषद प्राथिमक  शाळा काळेवाडी नं १  या ठिकाणी   शैक्षणिक वर्ष २०२६ : २०२७ ची सुरुवात सर्व मुलांना  मोफत सुलेखन वही पेन्सिल  पहिलीतील मुलांचे गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन स्वागत केले. नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही १६ मार्च पासुन उत्साहाने केली .शाळेच्या प्रगतीचा आलेख पाहुन इंग्रजी माध्यमातील दोन  पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळेत प्रवेश घेतला.त्यामुळे इतर शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत मुलांचा सर्वागीण विकास होतो .असे मत शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्री.वनराज पोटे  यांनी व्यक्त केले.
                शैक्षणिक वर्षाच्या सन २०२६ : २०२७ या प्रवेशा वेळी डाळज केंद्राचे केंद्र प्रमुख शशिकांत गावडे साहेब यांनी बोलताना सांगितले की पालक व शिक्षक यांच्यातील आंतर क्रिया घडुन आली की नक्कीच शाळेची प्रगती होती. विद्यार्थी सर्वांगिण विकासात जिल्हा परिषद शाळेचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन आदर्श निर्माण करावा असे आव्हान केले .
            या कार्यक्रमात महिला दिनाचे औचित्य साधुन रुपरेषा करुन महिलासाठी महिलांना पैठणी , कुकर  व टी -  सेट अशा स्वरुपाचे बक्षिस देऊन विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सहभागी होता .  सर्व उपस्थित महिला वर्गाला माँ के नाम एक पेड म्हणुन गुलाबाचे रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.  
          या कार्यक्रमासाठी पळसदेव  ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ दिपाली महेंद्र काळे ताई यांनी ही मनोगत व्यक्त गेले . या वेळी ग्रामपंचायत मा. सरपंच श्री. अजिनाथ पवार.व शाळा व्यवस्थापन उपअध्यक्ष श्री.अतुल काळे , श्री.सोमनाथ काळे , सागर गांधले , अनिकेत काळे. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन उपक्रमशील शिक्षिका सौ.कांचन रणपिसे , अंगणवाडी सेविका संगिता चव्हाण , व मदतनीस मिराताई नाईकवाडी. यांच्या संकल्पनेतुन झाला. या वेळी सर्व महिला वर्गाना जेवणाची सोय करण्यात आली. उत्साहात महिला दिनाचा कार्यक्रम प्राथमिक शाळा काळेवाडी नंबर 1 येथे प्रथमच सर्व महिलांमधून राबवण्यात आला त्यामुळे महिलावर्ग यांनी उत्साहात तो साजरा केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सन्मान संतोषजी हेगडे सर यांनी केले. 
       कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री.प्रताप शिरसट सर व आभार उपशिक्षिका सौ.कांचन रणपिसे मॅडम यांनी मानले.
close