shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा


          आज दि 24 /03/2026 रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्षयरोगाचे जनक डॉक्टर रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रितेश पुंड STSमोर्शी यांनी केले.



 त्यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात क्षयरोगाबाबत उपस्थित त्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष भाषण श्री डॉ प्रमोद पोतदार सर यांनी केले. त्यांनी उपस्थित त्यांना क्षयरोग कसा होतो त्यांची प्राथमिक लक्षणे काय याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ सचिन कोरडे सर यांनी सुद्धा उपस्थित त्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री अमोल झाडे टीव्ही एच वी यांनी उपस्थितांना क्षयरोगाबाबत शपथ दिली. तसेच श्रीकांत गोहाड यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमांचा समारोप केला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता श्री आशिष पाटील,श्री विनय शेलूरे,श्री प्रशांत बेहरे,श्री श्रीकांत गोहाड,श्री प्रकाश मंगळे, नंदू थोरात, श्री पावडे, कविता इंगोले श्री राहुल बोरकर, श्री नागोराव खडसे यांनी अथक परिश्रम घेतले.
close