shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरटीई ऍडमिशन संदर्भात चौकशी करण्याबाबतचे तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनीदिले इंदापूर गटशिक्षणाधिकारीयांच्या नावे निवेदनपत्र .

आरटीई ऍडमिशन संदर्भात चौकशी करण्याबाबतचे तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनी
दिले इंदापूर गटशिक्षणाधिकारीयांच्या नावे यांना निवेदनपत्र .
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारीयांच्या नावे  आरटीई ऍडमिशन संदर्भात चौकशी करण्याबाबत तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनी आज दि.20 एप्रिल 2026 रोजी निवेदन पत्र दिले आहे.
यामध्ये त्यांनी आरटीई ऍडमिशन मध्ये खूप मोठा घोळ, खरे  गोरगरीब गरजवंत यांची मुलं यापासून वंचित राहिले आहेत, 
       इंदापूर तालुकयातील  आरटीआय ऍडमिशन साठी अनेक लोकांनी शाळेपासून जिथे घर नाही तेथील पत्रा शेड किंवा काही दुकानाचे लोकेशन टाकून 0.34मीटर 0.37मीटर 0.47 मीटर अंतर दाखवून आरटीई ऍडमिशन फॉर्म भरले आहेत व ते मंजुरी करून घेतले आहेत, शासनाने दाखवून द्यावेत शाळेपासून 0.34 मीटरवर किंवा 0.50 मीटरवर कुठे राहती घर आहेत तशी चौकशी करावी.
तसेच तेथील आसपासच्या लोकांकडून ज्यांच्या दोन पत्र्याच्या रूम आहेत अशा काही महाभागाने पाच पाच सहा सहा भाडे करार काही पैसे घेऊन लोकांना करून दिले आहेत. 
तसेच अनेक भाडेकरार हे फॉर्म सुटल्यानंतर च्या तारखेचे आहेत असेही निदर्शनास आले आहे या सर्व गोष्टीची दोन दिवसात चौकशी होऊन यावरती ठोस निर्णय घ्यावा.गेल्या वर्षीही अनेक अडमिशन चुकीच्या पद्धतीने झाली त्यावेळी आम्ही पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता आणि आता पुन्हा तेच घडत आहे यावेळी आम्ही गप बसणार नाही हेही अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे, आरटीई ऍडमिशन ही गोरगरिबांसाठी आहेत का श्रीमंत लोकांसाठी आहेत हेच कळंना झाले आहे, पाठीमागील दोन-तीन वर्षापासून चे आरटीआय ऍडमिशन चौकशी केली तरी इंदापूर पासून 25 ते 30 किलोमीटरवर राहणाऱ्या लोकांची मुलही आरटीआय मार्फत शिकतात ती मुलं बसणे येतात मग एक किलोमीटर दीड किलोमीटरचा निर्णय नियम त्यांना कसा लागू होतो याचीही चौकशी करावी आम्हाला कुठल्याही मुलांच्या शिक्षणावर गदा आणायचे नाही परंतु आरटीआयचा उद्देश गरिबांची मुलं शिकणे आहे परंतु इथे तर धनदांडगे राजकारणी आपल्या ओळखीच्या किंवा पैशाच्या जोरावर शाळेच्या शेजारीपाजाऱ्यांकडून भाडेपट्टा करार बोगस करून घेतात व आपल्या मुलांना ऍडमिशन घेतात मात्र गोरगरिबांचे ओळख नसल्याकारणाने किंवा पैशाअभावी त्यांची मुलं या ऍडमिशन पासून वंचित राहत आहेत याचा शासनाने विचार करून आरटीआय मध्ये काहीतरी ठोस निर्णय घ्यावेत ही शासनाला विनंती अशा असयाचे निवेदन पत्र सुनील मोघल अधिकारी यांना दिले आहे.
close