shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडी येथे पाच दिवसीय इंटिग्रेटेड योग शिबिर उत्साहात

झगडेवाडी येथे पाच दिवसीय इंटिग्रेटेड योग शिबिर उत्साहात
इंदापूर: मौजे झगडेवाडी (ता.इंदापूर जि. पुणे ) येथे पाच दिवसीय इंटिग्रेटेड योग शिबिर उत्साहात संपन्न.
  मार्च 2026 मध्ये इंदापूर येथे संपन्न झालेल्या योग शिबिराच्या दरम्यान पतंजली योगपीठ हरिद्वार चे केंद्रीय प्रभारी  पू .स्वामी परमार्थदेव यांनी इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात योग शिबिराचे आयोजन करणे बाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने दि . 15 एप्रिल 2026 ते दि . 19एप्रिल 2026 मध्ये पाच दिवसीय शिबिर मौजे झगडेवाडी येथे गावचे आदर्श सरपंच  अतुल झगडे व मा .सरपंच रूपाली अतुल झगडे व उपसरपंच डॉ. दादाराव झगडे ,नामदेव झगडे, उपसरपंच सचिन अभंग, नवनाथ अभंग, प्रल्हाद अभंग, गेमदेव अभंग, मोहन झगडे, लक्ष्मण झगडे, अरुण झगडे, व ग्रामस्थ व महिला भगिनी इत्यादींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवा
सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व पतंजलीचे तहसील प्रभारी दतात्रय अनपट व योगशिक्षक  शहाजी बोराटे ,  भाऊसाहेब शिंदे, संजय मोरे, भारत बोंगाणे डॉ .नंदकुमार यादव, लहू गाढवे , अंकुश डुके, सुधीर मखरे ,राजाभाऊ सोनमाळी  दशरथ मोरे ,विलास गाढवे,राजश्री शिंदे,सौ. नीता नलवडे,सौ . इंदुमती बोराटे, सौ .प्रतिभा गुजराथी,सौ . आरती गुजराथी , सौ .हेमलता बोंद्रे , अश्विनी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवसीय इंटिग्रेटेड योग शिबिर उत्साहात व बहुसंख्य साधकांच्या उपस्थितीत संपन्न झाले 
   या शिबिरात ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी अशी ग्वाही दिली की आम्ही हा योग वर्ग निरंतर व निशुल्क सातत्याने चालू ठेऊ अशी ग्वाही दिली .
close