shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मिरजगावात श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळ्याची जय्यत तयारी..२ व ३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांना उपस्थितीचे आवाहन..!

मिरजगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील मिरजगाव, रत्नजन रोड परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, येत्या शनिवार दि. २ मे व रविवार दि. ३ मे २०२६ रोजी हा भव्य धार्मिक सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक विधी, भजन, महाप्रसाद व कलशारोहण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

पहिल्या दिवशी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत मूर्ती व कलश मिरवणूक, दुपारी १ वाजता महाप्रसाद, त्यानंतर ४ वाजता गंगापूजन व सायंकाळी ६ ते ८ महाप्रसाद होणार आहे. रात्री ८.३० ते १० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध तबलावादक श्री. शेखर दरवडे प्रस्तुत श्री हनुमान चालीसा व भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मूर्ती स्थापना, १०.१५ वाजता कळसारोहण व महाआरती, तसेच १०.३० पासून भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
या सोहळ्यास श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी विष्णुचेतन्य तीर्थजी महाराज (दिल्ली) यांचे शुभहस्त लाभणार आहेत. तसेच विधी पूजन श्री वेदमूर्ती महेशजी शशिकांत नंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब, सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून मा. श्री. लहूजी रामभाऊ वतारे हे कार्यरत आहेत.
हा भव्य धार्मिक सोहळा समस्त वतारे परिवार व भाऊसाहेब तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

close