shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ


यशस्वी जयस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. अशाप्रकारे राजस्थानने आयपीएल २०२६ मधील पंजाब किंग्सची अपराजित मालिका संपुष्टात आणली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत चार गडी गमावून २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, यशस्वी आणि फरेरा यांच्या अर्धशतकांच्या आणि शुभमच्या शानदार योगदानाच्या जोरावर राजस्थानने १९.२ षटकांत चार गडी गमावून २२८ धावा करत सामना जिंकला.
पंजाब गुणतालिकेत अव्वल स्थानी
आठ सामन्यांमधील पंजाबचा हा पहिला पराभव आहे. त्यांनी सहा सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या पराभवानंतरही पंजाब १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. दरम्यान, राजस्थान नऊ सामन्यांतून १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) दुसऱ्या स्थानावर आहे.

फरेराचा विजयी षटकार
राजस्थानसाठी, फरेराने २६ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या, तर यशस्वीने २७ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या. शुभमने १२ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. शुभम आणि फरेरा यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ७७ धावांची भागीदारी केली. पंजाबकडून युझवेंद्र चहलने तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने एक बळी घेतला.

पंजाबची दमदार सुरुवात
यापूर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रियांश आर्याने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. पंजाब किंग्सने चांगली सुरुवात करत पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून ६५ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकार मारून आपले खाते उघडले, तर प्रियांश आर्याने (२९) नंद्रे बर्गरच्या सलग दोन चेंडूंवर तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. प्रियांशने पुढच्याच षटकात आर्चरच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारले, पण त्यानंतर बर्गरने त्याचा सोपा झेल घेतला.

प्रभसिमरन-कॉनॉलीची भागीदारी
कूपर कॉनॉलीने (३०) लेग-स्पिनर यश राज पुंजाचे सलग दोन षटकारांनी स्वागत केले आणि त्यानंतर रवींद्र जडेजाचा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला. मात्र, कॉनॉलीने यशच्या पुढच्याच षटकात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि लाँग ऑफला उभ्या असलेल्या डोनोव्हन फरेराने त्याचा सोपा झेल घेतला. कॉनॉली आणि प्रभसिमरनने ५९ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरनने नवव्या षटकात यशच्या गोलंदाजीवर चौकार मारून संघाला १०० धावांच्या पुढे नेले आणि त्यानंतर जडेजाच्या गोलंदाजीवर एक धाव घेत ३५ चेंडूंमध्ये या हंगामातील आपले चौथे अर्धशतक पूर्ण केले.


स्टोइनिसची शानदार खेळी
कर्णधार श्रेयस अय्यरनेही संथ सुरुवातीनंतर यशच्या गोलंदाजीवर षटकार मारला, पण प्रभसिमरनने लेग-स्पिनरचा चेंडू हवेत उडवला आणि कर्णधार रियान परागकडे सोपा झेल दिला. प्रभसिमरनने सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी केली. यानंतर, मार्कस स्टोइनिसने सहा षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ६२ धावांची नाबाद खेळी केली. स्टोइनिसच्या वादळी खेळीमुळे पंजाब किंग्स संघ शेवटच्या तीन षटकांमध्ये ५५ धावा जोडण्यात यशस्वी झाला. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने धावा केल्या. राजस्थानकडून यश राज पंजाबने दोन बळी घेतले, तर जोफ्रा आर्चर आणि नंद्रे बर्गर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

आयपीएल २०२६ मध्ये बिहारचा १५ वर्षीय तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशी याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. त्याने आपल्या कामगिरीने अनेक ऐतिहासिक विक्रम मोडले आहेत. 

आयपीएल २०२६ मधील वैभव सूर्यवंशीची प्रमुख कामगिरी:
ऐतिहासिक शतक: वैभवने केवळ ३६ चेंडूंमध्ये शतक ठोकून आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतकांपैकी एक विक्रम आपल्या नावावर केला.
सर्वात तरुण शतकवीर: १५ व्या वर्षी शतक झळकावणारा तो टी-२० क्रिकेटमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
४००+ धावा: एप्रिल २०२६ च्या अखेरीस, तो आयपीएल २०२६ मध्ये ४०० हून अधिक धावा करणारा आणि सर्वाधिक धावा करणारा (Orange Cap शर्यतीत) फलंदाज बनला आहे.
भयमुक्त फलंदाजी: त्याने ९ डावांमध्ये ४४.४४ च्या सरासरीने आणि २३८ च्या प्रचंड स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
षटकारांचा पाऊस: त्याने आतापर्यंतच्या सामन्यांत ३० हून अधिक षटकार मारले आहेत.
विक्रमी भागीदारी: पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 

@डॉ.दत्ता विघावे               
     क्रिकेट समिक्षक
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close