shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणसिंग महाविद्यालयात रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन (प्रयास) कार्यक्रम संपन्न

रणसिंग महाविद्यालयात रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन (प्रयास) कार्यक्रम संपन्न
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्था सचिव वीरसिह रणसिंग यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली “युवकांसाठी रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन (प्रयास)” या अभ्यासक्रमांतर्गत ‘वाहतूक नियम, चिन्हे आणि परवाना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहन चालविण्याच्या पद्धती, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेली काळजी याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथून आर.टी.ओ. निरीक्षक प्रियंका सस्ते या प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सिग्नल आणि परवाना, कायदेशीर जागरूकता या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि जबाबदार वाहनचालक होण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध प्रश्न विचारून शंका निरसन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली आणि भविष्यात सुरक्षित वाहनचालक होण्यासाठी प्रेरणा मिळाली.
व्याख्यानादरम्यान वाणिज्य शाखा व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासक्रम समन्वयक डॉ. तेजश्री हुंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता निंबाळकर व आभार प्रा. ज्ञानेश गवळी यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे, प्रा. योगेश खरात, प्रा. महादेव माळवे इ मान्यवर व  विद्यार्थी उपस्थित होते.
close