मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा लाभ घ्यावा - सौ.शालिनीताई विखे पा.
गरजू रुग्णांनी मोफत सर्वरोगनिदान आणि उपचार शिबीराचा लाभ घ्यावा आणि व्याधीमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालय, डॉ. बाळासाहेव विखे पाटील वैद्यकिय महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आणि अनुलोम संस्था यांच्यावतीने बोबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी सौ. शालिनीताई विखे पा.बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सौ. निशाताई निर्मळ होत्या. सौ. विखे पाटील पुढे म्हणाल्या, तरुण शेतकरी मुलांनी रसायनमुक्त शेतीला प्राधान्य यावे. भाजीपाला पिकासाठी सेंद्रीय निविष्ठांचा वापर करावा. कोरोना काळातील वापरात आलेल्या काही औषधांमुळे प्रतिकार शक्ती कमी होऊन रक्तदाब, मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. अमर्याद रासायनिक घटकांमुळे कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. ही गंभीर बाब आहे
मध्यंतरी गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना कर्जमाफीसह नुकसान भरपाई मिळावी यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रयत्न केले आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी सरपंच भागवतराव ढोकचौळे यांनी मनोगत व्यक्त केले. सौ.शालिनीताई विखे पाटील यांचा सत्कार प्रमिला गोरक्षनाथ सदाफळ आणि शारदाताई नवनाथ ढोकचौळे यांनी केला तर निशाताई निर्मळ यांचा सत्कार सरपंच छायाताई बर्डे व उपसरपंच भारतीताई वाघमारे यांनी केला. अनुलोम संस्थेचे पुणे विभाग प्रमुख शिरिष भालेकर व संवादिनी सुनंदाताई आदिक यांचा सत्कार अनुलोम मित्र दिपक खरात व कृषी सखी पुजाताई नगरकर यांनी केला. किशोर टेके वैशाली उदावंत, राजेंद्र भांड रांजणखोलच्या सरपंच शुभांगीताई ढोकचौळे, पोलीस पाटील कृष्णा अभंग यांचाही सत्कार करण्यात आला. शिबीरात ४६० रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.
२५ रुग्णांचा पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात होणार आहेत. कार्यक्रम यशस्वीततेसाठी गोरक्षनाथ सदाफळ, चंद्रशेखर ढोकचौळे, रामचंद्र त्रिभुवन, योगेश वैद्य, सुरेश पवार, सुरेश विघावे, महेश मरकडे, दिनकर सदाफळ, विनोद पवार महेश मरकडे, सुरेश मुंढे, शिवाजी घोरपडे, अक्षय खैरनार, खंडेराव सदाफळ यांनी परिश्रम घेतले. अनुलोम मित्र दिपक खरात यांनी शिस्तबद्ध नियोजन केले.

