shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘एकत्र या हिंदूंनो!’ शिर्डीत महासंमेलनातून घुमला एकतेचा बुलंद नारा


भव्य बाईक रॅली, भारतमाता पालखी सोहळा व महाआरतीने हिंदू महासंमेलनाची अनोखी सुरुवात!

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )

           ‘विसरून पंथ-जाती... एकत्र येऊ हिंदू धर्मासाठी’ या उदात्त हेतूने शिर्डी व पंचक्रोशीतील हिंदू बांधवांसाठी बुधवारी, १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले 'हिंदू महासंमेलन' प्रचंड उत्साहात आणि भगव्या वातावरणात पार पडले. सुरुवातीला हिंदू महासंमेलनाचे प्रमुख वक्ते श्री राजाभाऊ मुळे व श्री भरत आमदापुरे यांनी संमेलन समितीच्या सदस्यांसोबत श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन शेकडो युवक व युवतींच्या भव्य बाईक रॅलीची सुरुवात भगव्या ध्वज फडकावून केली. तदनंतर बाईक रॅली द्वारका सर्कल येथे पोहचल्यावर तेथून शेकडो माता भगिनींच्या उपस्थित अनोखा असा भारतमाता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचल्यानंतर भारत माता व श्री साईबाबांची महाआरती उपस्थित सर्वांच्या हस्ते करण्यात आली.
        सायंकाळी साई किमया गार्डन येथे मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम "मी भगवा ध्वज बोलतोय..!" याचे सादरीकरण समितीचे सदस्य श्री अशोक गोंदकर व मणिलाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली साई निर्माण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. पुढील हिंदू विशेष' सत्रात गुरुवर्य ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक (वरद विनायक देवस्थान ट्रस्ट, लोणी),यांनी उपस्थित सर्व हिंदू समाजाला आशीर्वाचन दिले. रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रविंद्र गणेश मुळे (राजाभाऊ) यांनी संघ शताब्दी निम्मित पंच परिवर्तन बिंदूंची माहिती दिली. त्यात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी शिष्टाचार व 'स्व बोध' याविषयी माहिती दिली. हिंदुत्ववादी विचारक IIT इंजिनियर श्री. भरत आमदापुरे यांनी हिंदू धर्मापुढील आव्हान, शत्रू बोध, सार्थ्यशाली व संघटित समाज यांसारख्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदू धर्माचे संस्कार आणि संवर्धन यावर त्यांनी मोलाचे विचार मांडले.
       तसेच विशेष म्हणजे शिर्डीतील इयत्ता पाचवीतील कु. महिमा ठाकूर हिने सध्याच्या ज्वलंत समस्यांवर, विशेषतः 'लव्ह जिहाद'वर तिने अतिशय सडेतोड प्रहार केले. हिंदू समाजाला खडबडून जागे करताना ती म्हणाली, "हिंदू समाज कधी एकत्र येतच नाही; कोणी मराठा बनतो, कोणी ब्राह्मण, कोणी राजपूत, तर कोणी दलित... पण 'हिंदू' कोणीच बनत नाही. धर्म टिकवायचा असेल तर आधी हिंदू बनायला शिका!" तिच्या या निर्भय आणि रोखठोक भाषणामुळे उपस्थितांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले आणि 'जय श्रीराम', 'हर हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संमेलनाच्या शेवटी उपस्थित सर्वांना हिंदू धर्म रक्षणाची शपथ समितीचे महा व्यवस्था प्रमुख प्रतापराव जगताप यांनी दिली.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती उपाध्यक्ष श्री जगन्नाथ गोंदकर, मान्यवरांचा सत्कार समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय लुटे व कोषाध्यक्ष श्री तुकाराम गोंदकर व सौ.रंजना सावंत, सूत्र संचालन समिती सदस्य श्री विशाल तिडके सर आणि आभार प्रदर्शन श्री अजित पारख यांनी केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी गजानन शेर्वेकर, योगेश कुमावत, परिमल वेद, ताराचंद कोते, दिपक वारुळे, रवि कोते, सुनील बारहाते, विनोद भोकरे, विजय वर्पे, आदित्य वाणी, दिलीपराव गोंदकर, सतिष गंगवाल, सुनील शिंदे, बद्रीमामा लोखंडे, चेतन कोते, प्रसाद पाटील, विरेश चौधरी, विक्रम गोंदकर, मुकुंद गोंदकर, तेजस वसगडेकर, पीयूष जाधव, शुभम ताम्हाणे, अनिल कोते, गौरव उपासनी, धनु मांजरे, नितीन नवलपुरे, विशाल कोळपकर, आकाश त्रिपाठी, रवी वैद्य, कृष्णा वारुळे, ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष व पत्रकार तुषार महाजन व असंख्य ज्ञात अज्ञात हिंदू बांधवांनी प्रयत्न केले व संमेलन यशस्वी केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
close