shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ताहाराबाद येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर वामनराव गवांदे यांचे दुःखद निधन


२३ एप्रिल रोजी 'म. फुले मंगल कार्यालय' येथे दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम

नगर प्रतिनिधी: 
ताहाराबाद येथील रहिवासी व सर्वपरिचित ज्येष्ठ नागरिक कै. मनोहर वामनराव गवांदे (वय ७३) यांचे मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने गवांदे परिवार व संपूर्ण ताहाराबाद परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
कै. मनोहर गवांदे हे एक मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सूनबाई, दोन मुली, जावई, नातवंडे आणि मोठा असा समस्त गवांदे परिवार आहे. त्यांच्या निधनाने श्री. शामकांत मधुकर गवांदे, श्री. बाजिराव मधुकर गवांदे, श्री. संजय प्रभाकर गवांदे, श्री. भुषण मनोहर गवांदे आणि श्री. जिवन अशोक गवांदे यांच्यासह संपूर्ण गवांदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कै. मनोहर वामनराव गवांदे यांचा दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता 'म. फुले मंगल कार्यालय', ताहाराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे, अशी माहिती शोकाकुल समस्त गवांदे परिवारातर्फे देण्यात आली आहे.
close