वडाळा महादेव [ वार्ताहर ] मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी अध्यक्ष अनिल साळवे सर यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष अँड दादासाहेब निघुट जितेंद्र पाटील किशन सेठ आहुजा प्रा दादासाहेब कर्णे ज्ञानेश्वर सारंगधर निर्मल इनामके बाळासाहेब जपे तसेच मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे ॲड दादरसाहेब निघुट यांनी आभार मानले.

