शेंदूरजना घाट / प्रतिनिधी:
संत्रा नगरी शेंदूरजना घाट येथे मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी श्री संत शिरोमणी सेनाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी संत सेनाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने शेंदूरजना घाट नगरपरिषदेच्या प्रथम नागरिक कु.सुवर्णा वरखडे, व सर्व सन्मानीय नगरसेवक तसेच वरूड- मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी नाभिक समाज भूषण व वरुड नगर परिषदेचे स्विकृत नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर , श्री मोहन निभोरकर रामकृष्ण शिरूळकर, माणिकदास बेलुरकर, राजीव बाभुळकर यांचाही सन्मान समस्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमात प्रसिद्ध इतिहास अभ्यासक हितेश ढोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष प्रदीप अतकरे यांनी नाभिक समाजाचा इतिहास तसेच संत सेनाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा वाचला.
यावेळी गटनेते तथा माजी नगराध्यक्ष व नगरसेवक प्रशांत उर्फ पिटूभाऊ सावरकर यांनी समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या असून त्या आदरणीय आमदार मोहोदयांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच नगराध्यक्षा कु. सवर्णा वरखडे व नगर सेविका निलीमा कुबडे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले व आयोजकांचे आभार मानले .
या कार्यक्रमात नाभिक समाजातील विविध वक्त्यांनी समाजाचा इतिहास, वर्तमान स्थिती आणि समस्या प्रभावीपणे मांडल्या. तसेच शेंदूरजना घाट नगरपरिषद हद्दीत नाभिक समाजाच्या आर्थिक विकासासाठी ‘नाभिक समाज भवन’ उभारण्याची मागणी आयोजकांनी प्रमुख पाहुण्यांसमोर मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेनाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. शेंदूरजना घाट येथील मध्यवस्तीतील गळाचे गोठाण येथील महात्मा सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी नाभिक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नाभिक समाजाचे प्रतिनिधी प्रविण सावरकर यांना नगर परिषदे मध्ये स्विकृत नगर सेवक बनऊन सभागृहामध्ये पाठविले त्याबद्दल समस्त नाभिक समाज बांधवांनी आमदारांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांचा भव्य सत्कार केला.
हा कार्यक्रम संत शिरोमणी सेनाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, शेंदूरजना घाट व समस्त नाभिक समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर
वरुड जि.अमरावती
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

