shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामवाडी येथे साईबाबा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न..


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठविल्या शुभेच्छा संदेश..

वाळकी प्रतिनिधी : रामवाडी गुंडेगाव येथे अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दि.२३ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न करण्यात आला.बुधवारी सकाळी कलश व मूर्ती मिरवणूक, विविध धार्मिक विधी सायंकाळी किर्तन इ. कार्यक्रम झाले तर गुरुवारी सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर आळंदी देवाची येथील विश्वेश्वर चैतन्य स्वामीजी महाराज यांच्या शुभ हस्ते साई बाबा मूर्तीची जलाभिषेक, पूजा अर्चा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी प.पु. शुभम जोशी गुरुजी (शिर्डी) पुजारी व सहकारी यांनी प्रायश्चित संकल्प, गणपती पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्य मंत्र, नांदीश्राद्ध, मंडप स्थापन, अग्नी स्थापन अरणी मंथन, मूर्ती जलाधिवास, विविध मंडल देवता स्थापन, हवन कर्म, मूर्ती न्यास, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन व साईबाबा आरती व महाप्रसाद वाटप करून विधी संपन्न केला.

        या प्रसंगी राजस्थान जयपूर येथील लहरीबाबा (कामख्या देवी) व शिष्यगण,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच संजय कोतकर, उपसरपंच सुनील भापकर, शिवनाथ कोतकर, पोपटराव भापकर,ह.भ.प.बाळासाहेब महाडिक, साहेबराव भापकर, हभप महादेव माने महाराज,ह.भ.प.संभाजी महाराज,छबुराव येठेकर, जयसिंग माने आदी मान्यवर उपस्थित होते.

        या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.
             यावेळी रामवाडी गुंडेगाव येथील साईबाबा भक्त गणांनी साई प्रती प्रेम व श्रद्धा ठेवून साई मंदिर जीर्णोद्धार केला आहे या ठिकाणी साईंचा वास असल्यामुळेच हे शक्य झाले आहे.आपल्या भागात साईंच्या कृपेने काहीच कमी पडणार नाही.तसेच धार्मिकता जपल्याचे मत विश्वेश्वर चैतन्य स्वामीजी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन रामवाडी साईबाबा मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले.


शुभेच्छा संदेश..

अहिल्यानगर जिल्ह्यातील रामवाडी, गुंडेगाव येथील श्री साईबाबा मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे समजून आनंद झाला. साईबाबांचे विचार आणि 'सबका मालिक एक' हा संदेश समाजाला शांती आणि समतेची वाट दाखवतो. गावच्या विकासात आध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचे असते. आपल्या गावातील या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून भक्ती आणि एकजूटीचा जो संगम पाहायला मिळत आहे, तो कौतुकास्पद आहे. यानिमित्ताने सर्व ग्रामस्थांचे, दानशूर व्यक्तींचे आणि कार्यकर्त्याचे मनःपूर्वक अभिनंदन !या मंगलमयी सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा !

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.


शुभेच्छा संदेश....

श्री साईबाबा मंदिर जिर्णोध्दार मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याचे रामवाडी, गुंडेगाव येथे आयोजन केल्याचे समजून आनंद झाला.
    ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याची बाब प्रशंसनीय आहे. प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभाच्या माध्यमातून भाविकांना मिरवणूक, महाआरती, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. परिसरात नागरिकांमध्ये एकोपा, प्रेम राहण्याच्या दृष्टीने आपण करीत असलेले कार्य सदैव असेच सुरु राहील, अशी खात्री वाटते.श्री साईबाबा मंदिर जिर्णोध्दार मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !

एकनाथ संभाजी शिंदे - उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
close